एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री… दसरा मेळाव्याच्या जाहीर भाषणात शिंदेंच्या बड्या नेत्याने थेट सांगून टाकलं, नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे हे भावी मुख्यमंत्री आहेत, असा उल्लेख एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुतीतील भविष्याची गणितं बदलणार असल्याचे संकेत त्यांच्या या वक्तव्यातून मिळाले आहेत.

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री... दसरा मेळाव्याच्या जाहीर भाषणात शिंदेंच्या बड्या नेत्याने थेट सांगून टाकलं, नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde Dasara Melava 2026
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 8:37 PM

दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे सुरु आहेत. दोन्ही सेनेचे सगळे नेते मुंबईत जोरदार भाषणं करत आहेत. यावेळी एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. पण यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारंही एक भाषण झालं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये पार पडत आहे. यावेळी शिंदेच्या सेनेचे मोठे नेते रामदास कदम यांनी जोरदार भाषण केलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आज शिवाजी पार्क मधील मैदान गाजवलेलं आहे. एक नेता एक आवाज असं होतं. उद्धवजींच्या सभेचं व्यासपीठ बघा. आमचे संजय राऊत म्हणाले, खरी शिवसेना आमची आहे. संजय राऊत तू खरा शिवसैनिक आहेस का? शिवसेना प्रमुख जिवंत असते तर काँग्रेससोबत जावून मुख्यमंत्री होवू दिलं असतं का ? राऊतांनी सांगावं. त्याला मूळात मुख्यमंत्री होवू दिलं नसतं. दिवाकर रावते आणि रामदास कदम मंत्रिमंडळातून बाहेर गेलेले नसते. शोले पिक्झर मधील आसरानी सांगायचे अधे इधर जावो आधे उधर जावो. रामदास कदम यांच्याकडून भाषणाच्या सुरवातीलाच एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

Loading...

एकनाथ शिंदेंच्या मागे संपुर्ण महाराष्ट्र उभा आहे. पाल मेल्यानंतर शेपटी वळवळत आहेत. पालीसारखी अवस्था तुमची उद्धव ठाकरेंची झालेली आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात सरकार निवडून आलेले आहेत. 232 लोक शिदे साहेब मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार होते पण काय झालं मला माहिती नाही.

जरांगे तुम्ही काल जे बोलले आहात ते पाचशे कोटी बाबत. एकनाथ शिंदेंना उद्धवस्त करायला निघालास तर तुला उद्धवस्त मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही. उपोषणाला बसतोस आणि बाथरूम मध्ये गूपचूप खातोस. लावा यांची चौकशी जरांगेची संपत्ती कुणाच्या नावावरआहे. तु कोणावरती बोलशील. 500 कोटी कुठे दिले आणि कुणी मोजले हे दाखवना. कोणाची सुपारी घेवून तू बोलत आहेस, असा घणाघात कदमांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us