पत्नी मुलीसोबत आयस्क्रीम खायला गेले आणि थेट पोहोचले अतिदक्षता विभागात.. नशेत तरूणांनी..

छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक घटना घडली. या घटनेने नागरिकांमध्ये मोठी भीती आहे. थेट पत्नी आणि मुलीसोबत बाहेर गेलेल्या व्यक्तीसोबत धक्कादायक घटना घडली. आयस्क्रीम खायला जावे महागात पडले.

पत्नी मुलीसोबत आयस्क्रीम खायला गेले आणि थेट पोहोचले अतिदक्षता विभागात.. नशेत तरूणांनी..
Chhatrapati Sambhajinagar
| Updated on: Sep 03, 2026 | 12:28 PM

छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगराची घटना ताजी असतानाच आता अजून एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. खवड्या डोंगरावर लेकाला वाचवताना वडील पडले आणि मुलगाही हे पाहून कुणाल चांदगुडे याच्या आईनेही उडी घेतली. कुणाल याने हे पाऊल आयफोनसाठी उचलल्याचे सांगितले गेले. पण त्यानंतर कुटुंबिय कारण पुढे आले. एकाच कुटुंबातील तीन लोकांचा जीव गेल्याने मोठी खळबळ उडाली. त्यातच आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. पत्नी-मुलीसोबत बाजारात गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जयभवानीनगरात नशेत धिंगाणा घालणाऱ्या तिघांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली. धारदार कात्रीने डोक्यावर वार करण्यात आली. कात्री डोक्यात रुतल्याने तरुण गंभीर जखमी झाला.

शस्त्रक्रिया करून कात्री बाहेर काढली गेली. अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोहित बोराडे, सचिन बोडखे आणि लक्ष्मण सोळंके या तिघांना अटक केली. याबाबत सविस्तर घटना अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या जयभवानीनगरात नशेत धिंगाणा घालणाऱ्या तिघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीसोबत आईस्क्रीम व औषध घेण्यासाठी गेलेल्या जितेश रमेश तुपशेंद्रे यांच्यावर रात्री आरोपींनी हल्ला केला. बाजारपेठेत आरोपींकडून दगडफेक सुरू होती. त्यातील एक दगड जितेश यांच्या पत्नी आणि मुलीजवळ पडल्याने त्यांनी आरोपींना जाब विचारला. याचा राग आल्याने तिघांनी जितेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लक्ष्मण सोळंके याने धारदार कात्रीने त्यांच्या डोक्यावर वार केला. कात्री डोक्यात खोलवर रुतल्याने जितेश गंभीर जखमी झाले.

रोहित बोराडे याने त्यांच्या बोटाचा चावा घेतला, तर सचिन बोडखे यानेही मारहाण केली. नागरिक जमा झाल्यानंतर आरोपी पसार झाले. गंभीर अवस्थेत जितेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून डोक्यात रुतलेली कात्री बाहेर काढली असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रोहित उर्फ पिल्ल्या भाऊलाल बोराडे, सचिन गणेश बोडखे आणि लक्ष्मण परमेश्वर सोळंके या तिघांना अटक केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us