AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगर हादरलं, मुलाला वाचवण्याच्या नादात वडील अन् मुलगा डोंगरावरून कोसळले, आईनेही मारली उडी, अख्खं कुटुंब संपलं

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरलं, मुलाला वाचवण्याच्या नादात वडील अन् मुलगा डोंगरावरून कोसळले, आईनेही मारली उडी, अख्खं कुटुंब संपलं
Chhatrapati SambhajinagarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 2:05 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुलगा आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर गेला होता, त्याला वाचवण्यासाठी वडील देखील डोंगरावर गेले, वडिलांना मुलाचा धक्का लागल्याने ते दोघेही डोंगरावरून खाली पडले, दरम्यान मुलगा आणि वडिलांच्या पाठोपाठ या डोंगरावर त्याची आई देखील गेली होती. मुलगा आणि वडील डोंगरावरून खाली पडल्याचं दिसताच आईने देखील डोंगरावरून उडी घेतली. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  डोंगरावरून पडल्यामुळे एक अख्ख कुटुंब संपलं आहे, एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलगा आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर चढला होता, त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागेच त्याचे वडील सुद्धा या डोंगरावर पोहोचले, त्यांना धक्का लागल्यामुळे मुलगा आणि वडील दोघेही या डोंगरावरून खाली कोसळले. दरम्यान दोघेही डोंगरावरून खाली कोसळल्याचा धक्का आईला सहन झाला नाही, आणि याच धक्क्यामधून आईने देखील डोंगरावरून उडी घेतली.  या घटनेत मुलगा आई-वडील असा तिघांचाही मृत्यू झाला आहे. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल  

दरम्यान  मुलगा आत्महत्या करणार असल्याची माहिती आधीच पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलीस आणि नागरिक आधीच घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधित मुलगा हा डोंगराच्या कड्यावर उभा होता, वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु दुर्दैवाने या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला, त्यानंतर पोटचा मुलगा आणि पती डोंगरावरून खाली कोसळल्याचं दु:ख सहन न झाल्याने शेवटी या महिलेने देखील डोंगरावरून खाली उडी घेतली. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एक हासतं खेळत कुटुंब संपलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप