AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 महिन्याची प्रेग्नेंट महिला धावली 42 किमीची न्यूयॉर्क मॅरेथॉन! एका वर्षात जगातील 7 मोठ्या मॅरेथॉन पूर्ण; कोण आहे ही धावपटू?

मॅरेथॉनमध्ये 42 किलोमीटर धावणे हे स्वतःमध्येच मोठे आव्हान असते. मात्र, अमेरिकेतील ३८ वर्षीय एका महिलेने धावण्याची आवड प्रेग्नन्सीमध्ये कायम ठेवत न्यूयॉर्क मॅरेथॉन पूर्ण केली. तिच्या या जिद्दीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

| Updated on: Nov 22, 2026 | 9:50 AM
Share
आधीच ६० हून अधिक मॅरेथॉन पूर्ण: अमेरिकेतील ३८ वर्षीय डिएड्रे कीन यांना धावण्याची आवड अनेक वर्षांपासून आहे. त्यांनी यापूर्वी ६० हून अधिक मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. २०२६ मध्ये एकाच वर्षात जगातील सात प्रमुख मॅरेथॉन पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले होते. यासाठी त्यांनी आधीच विविध स्पर्धांमध्ये नावनोंदणी केली होती.

1 / 5
डिएड्रे यांचा मॅरेथॉन प्रवास मार्चमध्ये टोकियोपासून सुरू झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी बोस्टन आणि लंडन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. मात्र, या स्पर्धांदरम्यान त्यांना जाणवले की पूर्वीच्या तुलनेत त्यांचा धावण्याचा वेग कमी झाला आहे. शरीरातही काही बदल जाणवत होते. त्यामुळे त्यांनी गर्भधारणा चाचणी केली. चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला. ही बातमी त्यांच्यासाठी आणि पती ब्रायन यांच्यासाठी आनंदासोबतच काहीशी चिंताही घेऊन आली.

2 / 5
गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर डिएड्रे यांनी आपले स्वप्न सोडण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅरेथॉनसारख्या अधिक आव्हानात्मक स्पर्धांमधून माघार घेतली. तसेच वेग वाढवण्याचा किंवा वेळेचा विक्रम करण्याचा दबाव न घेण्याचा निर्णय घेतला. गरज पडल्यास धावण्याऐवजी चालण्यावर भर दिला. आहार, पुरेसे पाणी पिणे आणि शरीराला जाणवणाऱ्या त्रासांकडे लक्ष देण्याबाबतही त्यांनी काळजी घेतली.

3 / 5
गर्भधारणेदरम्यान डिएड्रे यांनी सिडनी, बर्लिन आणि शिकागो मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला. सिडनी मॅरेथॉनच्या वेळी त्या २५ आठवड्यांच्या, बर्लिन मॅरेथॉनदरम्यान २९ आठवड्यांच्या, तर शिकागो मॅरेथॉनच्या वेळी ३१ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. नोव्हेंबरमध्ये त्यांनी गर्भधारणेच्या ३४व्या आठवड्यात न्यूयॉर्क मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. ४२.२ किलोमीटरचे अंतर त्यांनी ४ तास ६ मिनिटे ५५ सेकंदांत पूर्ण केले. यासह २०२६ मध्ये जगातील सात प्रमुख मॅरेथॉन पूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले.

4 / 5
डिएड्रे यांच्या या प्रवासामागे त्यांच्या वडिलांची प्रेरणा आहे. त्या अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांचे वडील जॉन यांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्यांनाही मॅरेथॉन धावण्याची प्रचंड आवड होती. आजारपणातही त्यांनी धावणे सुरूच ठेवले होते. शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधीही त्यांनी न्यूयॉर्क मॅरेथॉन पूर्ण केली होती, असे सांगितले जाते. वडिलांच्या याच जिद्दीचा प्रभाव डिएड्रे यांच्या मनावर झाला. कॉलेजमध्ये असताना त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ मॅरेथॉन धावण्यास सुरुवात केली. आता आपल्या मुलालाही कठीण परिस्थितीत हार न मानण्याची शिकवण द्यायची, अशी त्यांची इच्छा आहे.

5 / 5
Follow Us
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....