AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garlic Peeling Tips: महिलांनो फक्त 20 सेकंदात सोला लसूण, गृहिणींचा वाचेल वेळ, ‘या’ टिप्स करा फॉलो

Garlic Peeling Tips: स्वयंपाक करताना सर्वात जास्त कंटाळा लसूण सोलण्याचा येतो, यामध्ये वेळ देखील अधिक जातो. पण काही खास टिप्स वापरुन तुम्ही लसूण सोलू शकाल. ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल...

Garlic Peeling Tips: महिलांनो फक्त 20 सेकंदात सोला लसूण, गृहिणींचा वाचेल वेळ, 'या' टिप्स करा फॉलो
| Updated on: Nov 22, 2026 | 9:50 AM
Share

Garlic Peeling Tips: प्रत्येक भाजीमध्ये लसूण लागतोच. लसणामुळे फक्त पदार्थाची चवच वाढत नाही तर, आरोग्यासाठी देखील लसून फार फायदेशीर आहे. पण लसूण सोलताना फार कंटाळा येतो. लसणाच्या पाकळ्या बारीक असतील तर आणखी वेळ जातो. पण काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही लसून सोलू शकता. सांगायचं झालं तर, लसूण सोलणं हे स्वयंपाकघरातील सर्वात वेळखाऊ आणि त्रासदायक कामांपैकी एक आहे. हे एक मोठं डोकेदुखीचं काम ठरू शकतं, विशेषतः जेव्हा तुम्हाला लोणच्यासाठी किंवा इतर भाज्यांसाठी भरपूर लसूण लागतो. पण स्वयंपाकघरातील काही सोप्या युक्त्या वापरून, तुम्ही फक्त 20 सेकंदात मूठभर लसूण सहजपणे सोलू शकता.

बरणीच्या मदतीने तुम्ही लसूण सोलू शकता. चाकूच्या सपाट बाजूने पाकळ्या दाबून त्या वेगळ्या करा. या पाकळ्या झाकण असलेल्या स्टीलच्या किंवा काचेच्या बरणीत ठेवा. बरणी घट्ट बंद करा आणि 15 ते 20 सेकंद जोरात हलवा. जेव्हा तुम्ही बरणी उघडाल, तेव्हा तुम्हाला दिसेल की लसणाच्या सर्व साली निघाल्या आहेत. अशा प्रकारे काही सेकंदात तुम्ही लसून सोलू शकता

गरण पाणी देखील सलून सोलण्यासाठी उपयुक्त ठरेल. लसणाच्या पाकळ्या एका भांड्यात ठेवा आणि त्यावर थोडे गरम पाणी घाला. त्यांना पाण्यात 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवा. उष्णतेच्या संपर्कात आल्याने लसणाची साल मऊ होते. त्यानंतर, लसूण हातात घेऊन चोळल्यास त्याची साल सहज काढता येते.

मायक्रोवेव्हच्या मदतीने देखील तुम्ही लसणाच्या साली सोलू शकता. लसणाच्या पाकळ्या एका प्लेटवर ठेवा आणि 15 ते 20 सेकंदांसाठी मायक्रोवेव्ह करा. बाहेर काढून दाबल्यावर त्याची साल सहज निघाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ मायक्रोवेव्ह करू नका, कारण जास्त गरम झाल्यास लसूण जळू शकतो.

मध्यम आचेवर एक तवा किंवा कढई गरम करा आणि गॅस बंद करा. किंवा, ती अगदी मंद आचेवर ठेवा. लसणाच्या पाकळ्या टाका आणि 20 – 30 सेकंद परता. जेव्हा साल निघू लागेल, तेव्हा ते थंड होऊ द्या आणि नंतर हाताने चोळा म्हणजे साल सहज निघेल. जर तुम्हाला लसणाच्या एक-दोन पाकळ्यांची साल पटकन काढायची असेल, तर त्या पाकळ्या कटिंग बोर्डवर ठेवा आणि एका रुंद सुरीच्या सपाट बाजूने त्यावर दाब द्या. साल निघून येईल.

लसणाचे आरोग्यास होणारे फायदे…

लसून आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. लसणातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात, ज्यामुळे पेशींचे नुकसान टाळण्यास आणि दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत मिळते. एवढंच नाही तर, कच्चा लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यास ॲसिडिटी, जळजळ, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते. पण कोणत्या समस्या असल्यास लसून खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Follow Us
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....