AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानमध्ये धुळ्यातील 9 भाविकांचा दुर्दैवी अंत; एकाच कुटुंबातील सर्वजण, मृतांची नावे आली समोर

राजस्थानमध्ये धुळ्यातील 9 भाविकांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातात मृत्युमुखी पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत, अपघातामधील मृतांची नावे समोर आली आहेत.

राजस्थानमध्ये धुळ्यातील 9 भाविकांचा दुर्दैवी अंत; एकाच कुटुंबातील सर्वजण, मृतांची नावे आली समोर
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 10:07 AM
Share

देशातील विविध भागात अपघाताची मालिका सुरूच आहे. याच अपघात सत्रादरम्यान राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये खाटू श्यामजींच्या दर्शनावरून परतताना धुळ्यातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील सर्व जण हे धुळे जिल्ह्यातील आहेत. या भीषण अपघातातील 9 जणांच्या मृत्यूने धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्य कोटामध्ये धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. खाटू श्यामजींचं दर्शन घेऊन परतताना भाविकांच्या तीनपैकी एका वाहनाचा अपघात झाला. या वाहनातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर  2 गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामधील जखमींवर कोटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण घटनेने धुळे शहरातील सत्यसाईबाबा नगर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंब परिवारातील नातेवाईक मृत्युमुखी  झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाता मृत्युमुखी पावलेल्या लोकांची नावे देखील समोर आली आहेत. या अपघातात धुळे शहरातील चौघांचा मृत्यू झाला.  सज्जन पवार, उषा पवार, माधवी पवार, सांगवी पवार अशी मृतांची नाावे आहेत. तर धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कैलास पवार, अनिता पवार, जानवी पवार यांचा समावेश आहे. तर शहादा येथील, सुशीला पवार आणि बाबुलाल पवार यांचाही मृत्यू झाला आहे. तर अपघातात सहा जण गंभीर झाले आहेत. एकाच कुटुंबातील 9 जणांच्या मृत्यूने पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या पीडित नातेवाईकाने सांगितलं की, ‘आम्ही सर्वजण मिळून 36 नातेवाईक होते. आम्ही मिळून तीन गाड्या केल्या होत्या. खाटू श्यामजींचं दर्शन घेऊन परतत होते. आम्ही एका हॉटेलला थांबलो. आमच्या दोन गाड्या मागे होत्या. तर तिसरी गाडी पुढे गेली होती. तितक्यात कारचा अपघात झाल्याचे बहिणीने सांगितले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली’.

Follow Us
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....