हॉटेलमध्ये प्रॅक्टिस सुरू असता चुकून गोळी सुटली, थेट बेडमध्येच… टायगर श्रॉफ प्रकरणात खळबळजनक खुलासा, पोलिस..

अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. आरोपींनी टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यापूर्वी अनेकदा गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण घेतले. मुंबईजवळही त्यांनी गोळीबार केला.

हॉटेलमध्ये प्रॅक्टिस सुरू असता चुकून गोळी सुटली, थेट बेडमध्येच... टायगर श्रॉफ प्रकरणात खळबळजनक खुलासा, पोलिस..
Actor Tiger Shroff
| Updated on: Oct 22, 2026 | 8:41 AM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. अभिनेता फुटबॉल खेळून घराच्या दिशेने निघाला. चाहते मोठ्या प्रमाणात त्याच्या आजुबाजूला होते. यादरम्यानच तीन हल्लेखोरांनी टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार केला. टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला. मात्र, त्याच्या चालकाला गोळी लागली आणि तिथे उपस्थित असलेल्या एका व्लॉगरलाही गोळी लागली. या प्रकरणात पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस चाैकशीत एका मागून एक धक्कादायक माहिती पुढे येतंय. ऋतिक, रेहान आणि फूल सिंग यांनी चाैकशी सांगितले की, त्यांनी अनेक अभिनेत्यांच्या घराची रेकी केली. शेवटी सर्व गोष्टी पाहून त्यांनी ठरवले की, टायगर श्रॉफ याच्यावरच हल्ला करायचा. त्यांनी बॉलिवूडच्या जवळपास सर्वच बड्या कलाकारांच्या ऑफिसची आणि घराची रेकी केली.

पण तिथे सुरक्षा अधिक असल्याने टायगर श्रॉफवर हल्ला करणे सोपे असल्याने मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवला. हेच नाही तर त्यांनी मुंबईजवळील एका परिसरात गोळ्या झाडण्याचा सरावही केला. आरोपींनी सराव केलेल्या जागेचीही माहिती पोलिसांनी घेतली. तिन्ही आरोपींनी तिथे गोळ्या झाडल्या. आरोपी बंदुकींची तपासणी करत असताना अंधेरीतील एका हॉटेलमध्ये खोलीत थेट बंदुक चुकून फायर झाली.

Loading...

ही गोळी थेट बेडवर लागली. मात्र, घडलेला प्रकार हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला नाही. आता पोलिसांकडून या हॉटेलची माहिती काढली जात आहे. आरोपींनी मुंबईत आल्यापासून दोन मोबाईल वापरली. त्यांनी टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आपली मोबाईल फेकून दिली. आता ती मोबाईल परत मिळवण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांकडे आहे. कारण त्यातच सर्वकाही माहिती दडलेली आहे.

आरोपींना मोठ्या बॉलिवूड कलाकारावर हल्ला करायचा होता. त्यात त्यांनी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घराचीही पाहणी केली. पण तिथे सुरक्षा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या कलाकारांच्या घराचे व्हिडीओही त्यांनी काढली. या हल्ल्यानंतर कॅनडात राहण्याची त्यांची व्यवस्था केली जाणार होती. मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us