कपल म्हणून हॉटेलमध्ये जाताये? मग सगळ्यात आधी चेक करा रूममधील ही वस्तू, माजी वेटरने सांगितलं टॉप सीक्रेट
अनेक जण पर्यटनादरम्यान हॉटेलमध्ये मुक्काम करतात, मात्र हे हॉटेल सुरक्षित असेलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अनेकदा हॉटेलमध्ये काही गैरप्रकार देखील घडतात. काही ठिकाणी तर स्पाय कॅमेरा देखील आढळून आले आहेत.

अनेकदा आपण पर्यटनादरम्यान हॉटेलमध्ये वास्तव्य करतो. परंतु तुम्ही ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य करतात ती हॉटेल पूर्णपणे सुरक्षित असेलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अनेकदा आपण पर्यटनाला निघण्यापूर्वीच हॉटेल बूक करत असतो. आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीने ती हॉटेल बूक करतो, त्यामुळे त्या हॉटेलबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते, फार तर फार आपण त्या हॉटेलला किती स्टार रिव्हू आहेत, हे पाहून हॉटेल बूक करायची की नाही? याचा निर्णय घेतो. परंतु अनेकदा हॉटेलमध्ये काही गैर प्रकार देखील घडतात. काही हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे देखील आढळून आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर कपल म्हणून एखाद्या हॉटेलमध्ये जाणार असाल तर रूममध्ये जाण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. याबद्दल हॉटेलमधील एका माजी कर्मचाऱ्याने आपला अनुभव शेअर केला आहे.
सर्वसाधारणपणे तुम्ही जेव्हा एखादी हॉटेल बूक करतात, तेव्हा ती हॉटेल तुमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असते. किंवा फार तर फार त्या ठिकाणी जर तुमचे कोणी नातेवाईक फिरण्यासाठी गेलेले असतील तर ते तुम्हाला ती हॉटेल सुचवतात. मात्र तुम्हाला त्या परिसराबद्दल हॉटेलबद्दल काहीच माहिती नसतं. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.
दरम्यान हॉटेलमधील एका माजी वेटरने आपला या संदर्भातील एक अनुभव शेअर केला आहे. या वेटरने सांगितलं की काही ठिकाणी स्पाय कॅमेरा असू शकतो. अशावेळी तुम्ही रूममध्ये गेलात तर सर्वात आधी तुमच्या रूममधील आरशांच्या काचा चेक करा असं त्याने म्हटलं आहे. कारण अनेकदा अशाच ठिकाणी स्पाय कॅमेरा असण्याची दाट शक्यता असते, असं या माजी कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. त्याच प्रमाणे तुम्ही ज्या रूममध्ये वास्तव्याला असता त्या रूममधील कोपरे देखील व्यवस्थित चेक करावेत असंही या वेटरने म्हटलं आहे. हॉटेल बूक करताना शक्यतो आधी सर्व चौकशी करूनच तसेच जीथे गर्दी असेल असचं हॉटेल बूक करावं, असंही त्याने म्हटलं.
