अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पतीची चार महिन्यांनी खबर, मानेत अडकलेल्या शर्टमुळे मोठा खुलासा

| Updated on: Feb 03, 2021 | 10:30 AM

पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पतीची चार महिन्यांनी खबर, मानेत अडकलेल्या शर्टमुळे मोठा खुलासा
Follow us on

सोलापूर : राज्यात अतिवृष्टीमुळे आर्थिक नुकसानीसह मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. याचंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. अतिवृष्टीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा चार महिन्यांनी सांगाडा सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (skeleton of a man swept away by heavy rains has been found four months later in solapur)

मिळालेल्या माहितीनुसार, अजय उर्फ दादा चौधरी असं सांगाडा आढळलेल्या तरुणाचं नाव आहे. चार महिन्यांनंतर मृतदेह समोर आल्याने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे तब्बल चार महिने मृतदेह पाण्यामध्ये असल्याने सडला होता. पण मानेच्या हाडांमध्ये गुंतला शर्ट पाहून मयताच्या पत्नीने ओळख पटवल्याचं सांगण्यात येत आहे.

अजय हा बार्शीत बाजार समिती तोलार म्हणून काम करत होता. 14 ऑक्टोंबर 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी घरी परतत असताना फपालवाडी ओढ्यात तो वाहून गेला होता. तेव्हापासून त्याचा पोलीस आणि कुटुंबीय शोध घेत होते. पण त्याचा कुठेही शोध न लागल्याने पोलिसात वाहून गेल्याची नोंद करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी पोलिसांनी मृतदेहाचं जागेवरच शवविच्छेदन करून सांगाना नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तब्बल चार महिन्यानंतर आपल्या पतीची अशी बातमी आल्यामुळे पत्नीला मोठा धक्का बसला आहे. तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. (skeleton of a man swept away by heavy rains has been found four months later in solapur)

संबंधित बातम्या – 

मैदानातील वादातून आधी मित्राला ढकललं, नंतर जमिनीत गाडलं, पुण्यात 13 वर्षीय तरुण ताब्यात

पिंपरी-चिंचवडमध्ये सेस्क रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

खळबळजनक, साताऱ्यात 150 फूट खोल दरीत बेपत्ता ट्रकचालकाचा मृतदेह आढळला

कुटुंब रंगलंय दरोड्यात, पुण्यातील एकाच कुटुंबातील 6 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक

(skeleton of a man swept away by heavy rains has been found four months later in solapur)