कुटुंब रंगलंय दरोड्यात, पुण्यातील एकाच कुटुंबातील 6 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबईजवळच्या कुरार पोलिसांनी (Mumbai Kurar Police) सहा जणांची ही अजब गँग पकडली आहे.

कुटुंब रंगलंय दरोड्यात, पुण्यातील एकाच कुटुंबातील 6 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक
चोरीप्रकरणात कुटुंबाला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी एका अख्ख्या कुटुंबाला चोरीप्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईजवळच्या कुरार पोलिसांनी (Mumbai Kurar Police) सहा जणांची ही अजब गँग पकडली आहे. आणखी तीन जण फरार आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे कुटुंब साधीसुधी चोरी करत नव्हते, केवळ ज्वेलर्सच यांचे टार्गेट होते. केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ज्वेलर्सवर यांनी डल्ला मारलाच, पण तेलंगणा, छत्तीसगडपर्यंत यांनी आपला पसारा व्यापला. कुरार पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर या चोरट्या फॅमिलीने आपला गुन्हा कबूल केला आहे. (Mumbai Kurar police caught the family in Pune in robbery case )

गेल्या महिन्यात 13 जानेवारीला दुपारी 2 वाजता टॅक्सीतून काही लोक उतरले. तिथून ते थेट ज्वेलर्समध्ये गेले. त्यापैकी तीन जण सोन्याचे दागिने पाहून पुन्हा निघून गेले. ते गेल्यानंतर ज्वेलर्समध्ये तब्बल 10 तोळे सोने चोरीला गेल्याचं उघड झालं.

यानंतर ज्वेलर्सने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर, हे कुटुंब पुण्यात राहात असल्याचं समजलं. पोलिसांनी पुण्यावरुन रेखा हेमराज वाणी 45 वर्ष, अक्षय हेमराज वाणी 19 वर्ष, शेखर हेमराज वाणी 28 वर्ष, रेणुका शेखर वाणी 23 वर्ष, नरेंद्र अशोक साळुंखे 35 वर्ष यांच्यासह टॅक्सीचालक आशुतोष मिश्रा यांना शनिवारी बेड्या ठोकल्या.

हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींकडून 1 लाख 90 हजार रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या 

मुलगी अल्पवयीन, 17 जणांचा बलात्कार, एका फोटोपासून अत्याचार सुरु  

चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25 हजार द्या, कळंबा जेल शिपायाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या

Published On - 1:05 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI