मुलगी अल्पवयीन, 17 जणांचा बलात्कार, एका फोटोपासून अत्याचार सुरु

मुलगी अल्पवयीन, 17 जणांचा बलात्कार, एका फोटोपासून अत्याचार सुरु
कर्नाटकात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात 15 वर्षांच्या मुलीवर पाच महिने 17 जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. (Raping Minor Girl Chikkamagaluru)

अनिश बेंद्रे

|

Feb 02, 2021 | 11:18 AM

बंगळुरु : अल्पवयीन तरुणीवर पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकात उघडकीस आला आहे. मुलीची मावशीच या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आहे. पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंगनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचाराची मालिका सुरु झाल्याची माहिती आहे. (Eight Arrested For Raping Minor Girl For Over Five Months In Chikkamagaluru)

15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पाच महिने 17 जणांकडून बलात्कार

कर्नाटकातील चिकमंगळुरु जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी 30 जानेवारीला 17 जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांच्या मुलीवर पाच महिने 17 जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले.

बसचालकाशी ओळख, मित्रांकडून अत्याचार

पीडित तरुण दगड फोडणाऱ्या कंपनीत काम करत असताना तिची ओळख गिरीश नावाच्या बस चालकासोबत झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. अभीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडितेची मावशीच मुख्य सूत्रधार

पीडित तरुणीच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर ती मावशीसोबत राहत होती. पोलिसांनी तिलाही अटक केली आहे. आरोपींची ओळख पटली असून अभी, गिरीश, विकास, मणिकांत, संपत, अश्वतगौडा, राजेश, अमित, संतोष, दीक्षित, संतोष, निरंजन, नारायण गौडा, अभी गौडा, योगेश, मुलीची मावशी आणि दगड फोडणाऱ्या कंपनीच्या मालकाचा समावेश आहे.

काँग्रेस नेत्या लावण्या बल्लाळ यांनी भाजप-संघाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. भाजप खासदारांनी या प्रकरणी मौन बाळगल्याबद्दल बल्लाळ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. (Eight Arrested For Raping Minor Girl For Over Five Months In Chikkamagaluru)

संबंधित बातम्या :

आधी हत्या, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; माजी नगरेवकाच्या आईच्या खुनामुळे परिसरात खळबळ

नागपूरचा बाबा, लंडनची मैत्रिण, फेसबुकवर मैत्री, थेट खिशाला कात्री !

(Eight Arrested For Raping Minor Girl For Over Five Months In Chikkamagaluru)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें