AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खळबळजनक, साताऱ्यात 150 फूट खोल दरीत बेपत्ता ट्रकचालकाचा मृतदेह आढळला

बेपत्ता असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील संगममाहुलीच्या ट्रकचालकाचा मृतदेह सापडलाय. त्यामुळे एकच खळबळ माजलीय.

खळबळजनक, साताऱ्यात 150 फूट खोल दरीत बेपत्ता ट्रकचालकाचा मृतदेह आढळला
| Updated on: Feb 02, 2021 | 7:45 PM
Share

सातारा : बेपत्ता असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील संगममाहुलीच्या ट्रकचालकाचा मृतदेह सापडलाय. त्यामुळे एकच खळबळ माजलीय. संतोष गोडसे असं या ट्रकचालकाचं नाव आहे. हा मृतदेह पाटणमधील उरुल घाटात 150 फूट खोल दरीत सापडला. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने हा मृतदेह बाहेर काढला. संबंधित चालकाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सातारा पोलीस घातपातसह सर्व शक्यतांचा तपास करत आहेत (Dead body of missing truck driver found in a valley in Satara).

सातारा शहरालगत असणाऱ्या संगम माहुली येथील बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. संतोष गोडसे हा ट्रकचालक म्हणून वनवासवाडी येथील व्यक्तीच्या ट्रकवर ड्रायव्हर होता. मात्र, पाटण तालुक्यातील उरुल घाटात त्याचा मृतदेह सापडल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मागील आठवड्यात विटाने भरलेला ट्रक घेऊन तो पाटणला गेला होता. त्यावेळी गाडीला गाडी घासल्यामुळे समोरच्या गाडीचालकासोबत त्याचा वाद झाला होता.

पाटण जवळच्या उरुल घाटात कामगारांना बाथरूमला जातो असं सांगून तो बेपत्ता झाला होता. मात्र, त्याचा दुपारी 150 फुट खोल दरीत मृतदेह सापडल्याने त्याच्या मृत्यचे गुढ वाढले आहे. या घटनेची माहिती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला मिळताच टीमच्या मदतीने व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणाचा अधिक तपास सातारा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा :

अहमदनगरच्या व्यावसायिकाला फेसबूकवरील मैत्री महागात, तब्बल 14 लाखांना बसला गंडा

सख्खे भाऊ पक्के दरोडेखोर, दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नरेंद्र मोदींच्या भावाच्या नावाचा वापर करुन पैसे उकळले, यूपी पोलिसांकडून एकाला अटक

व्हिडीओ पाहा :

Dead body of missing truck driver found in a valley in Satara

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.