सख्खे भाऊ पक्के दरोडेखोर, दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना अटक केली आहे. Pimapri Chinchwad Police arrested two robbers at the time of robbery

सख्खे भाऊ पक्के दरोडेखोर, दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पिंपरी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना अटक केलीय

पुणे: पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpari Chinchwad Police) दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोघेही सख्खे भाऊ आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्यानं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. पोलिसांनी घरफोडीच्या घटनांविरोधात कंबर कसल्यानं दरोडेखोरांना चाप बसेल, असा विश्वास कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला. (Pimapri Chinchwad Police arrested two robbers at the time of robbery)

2 जणांकडून 30 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

पिंपरी चिंचवड शहरात घरफोडीच्या घटनांना आला घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. दरोडा विरोधी पथकाने दोन सख्या भावना अटक केली असून त्यांच्याकडून 30 लाख रुपयांचा ऐवज हप्त करण्यात आला आहे. हे दोन्हीही सराईत गुन्हेगार असून एका कुटुंबातील हे आरोपी आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा लावून आरोपींना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केली.

सुरजितसिंह राजपालसिंह टाक आणि जितसिंह राजपालसिंह टाक अशी या दोन्ही आरोपीची नाव आहेत. पुणे पोलिसांनी यांच्या टोळीतील एका आरोपीला नुकतीच अटक केली आहे. इतर दोन जण अद्याप फरार आहेत. दोन्ही आरोपी आपल्या साथीदारांसह पुणे आणी पिंपरी चिंचवड शहरात चोऱ्या करायचे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

दरोड्याचा डाव उधळला

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात सापळा लावला होता. त्याप्रमाणे हे दोघे चार चाकी वाहनातून आल्याचं कळताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून हत्यार, चार वाहनं, टीव्ही आणि सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत 12 घरफोड्या आणि 8 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस आयुक्तांकडून पोलिसांचं कौतुक

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे. दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना अटक केल्यामुळे शहरात आगामी काळात चोरीच्या घटनांमध्ये घट होईल, असा विश्वास कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला. दरोडा विरोधी पथकाला दरोड्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर भोसरीमध्ये सापळा रचला आणि अल्टो गाडीचा पाठलाग करुन दोघांना अटक केली, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

कुटुंब रंगलंय दरोड्यात, पुण्यातील एकाच कुटुंबातील 6 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक

चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25 हजार द्या, कळंबा जेल शिपायाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या

(Pimapri Chinchwad Police arrested two robbers at the time of robbery)

Published On - 6:34 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI