नरेंद्र मोदींच्या भावाच्या नावाचा वापर करुन पैसे उकळले, यूपी पोलिसांकडून एकाला अटक

पोलिसांनी नरेंद्र मोदींच्या भावाच्या नावावर पैसे मागितल्याच्या आरोपावरुन एका युवकाला अटक केली आहे. (UP Police arrested Jitendra Tiwari)

नरेंद्र मोदींच्या भावाच्या नावाचा वापर करुन पैसे उकळले, यूपी पोलिसांकडून एकाला अटक
Husband Attack On Gym Owner

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या नावावर पैसे उकळल्याच्या आरोपावरुन एका व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशातील सूलतानपूरमधील ही घटना आहे. पोलिसांनी नरेंद्र मोदींच्या भावाच्या नावावर पैसे मागितल्याच्या आरोपावरुन एका युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. (UP Police arrested Jitendra Tiwari for taking money on the name of Pralhad Modi brother of Narendra Modi )

सूलतानपूर येथील पोलिसांनी या प्रकरणी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक भूपेंद्र सिंह यांनी या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती मिळाल्याचं सांगितलं. त्यानंतर संबंधित युवकाला अटक करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र तिवारी उर्फ जीतू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.भूपेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र तिवारी हा पंतप्रधानांच्या भावाच्या नावावर पैसे मागणाऱ्या टोळीमध्ये सहभागी असल्याचं सांगितलं.

तिवारीच्या कारवर मोदींच्या भावाचं पोस्टर

जितेंद्र तिवारीच्या कारवर नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांचं पोस्टर आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रल्हाद मोदी यांच्या माधवपूर येथे होणाऱ्या 4 फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमाचं ते पोस्टर होते.

भाजप जिल्हाध्यक्षांची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या जितेंद्र तिवारी याला गांभीर्यानं घेतलं नव्हतं असं भाजप जिल्हाध्यक्ष आर.ए.वर्मा यांनी सांगितलं. वर्मा यांनी त्यांच्याकडे तो युवक आला असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या:

आम्हाला मोदींचाच नंबर हवाय, त्यांना भेटायचंय; ‘त्या’ हेल्पलाईनवरुन नागरिकांचा आग्रह

मोदींच्या पुतणीला भाजप तिकीट देणार का? अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा!

Budget 2021 | अर्थसंकल्पादिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, LPG गॅस सिलिंडर महागला

(UP Police arrested Jitendra Tiwari for taking money on the name of Pralhad Modi brother of Narendra Modi )

Published On - 3:23 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI