आम्हाला मोदींचाच नंबर हवाय, त्यांना भेटायचंय; ‘त्या’ हेल्पलाईनवरुन नागरिकांचा आग्रह

या हेल्पलाईनवर खासदारांपेक्षा सामान्य लोकांचेच जास्त फोन येत आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेकजण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंबर मागत आहेत. | Helpline made for MP's

आम्हाला मोदींचाच नंबर हवाय, त्यांना भेटायचंय; 'त्या' हेल्पलाईनवरुन नागरिकांचा आग्रह
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 6:54 PM

नवी दिल्ली: दिल्लीत आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेने खासदारांसाठी एक विशेष हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनच्या मदतीने खासदारांना अर्थसंकल्प (Union budget 2021) आणि इतर आर्थिक बाबींवरील चर्चेसाठी लागणारी माहिती तातडीने उपलब्ध करुन दिली जात आहे. पण ही हेल्पलाईन सध्या वेगळ्याच कारणासाठी गाजत आहे. (Helpline for MP’s rural people get access now asks for PM Modi phone number)

कारण या हेल्पलाईनवर खासदारांपेक्षा सामान्य लोकांचेच जास्त फोन येत आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेकजण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंबर मागत आहेत. तसेच अनेकांना पंतप्रधान मोदी यांना भेटायचेही आहे. आम्हाला पंतप्रधानांना भेटून त्यांना काही सल्ले आणि सूचना द्यायच्या असल्याचे या व्यक्तींचे म्हणणे आहे. त्यामुळे या हेल्पलाईनचा मूळ उद्देश बाजूला पडला असून संबंधितांना खासदारांच्या नव्हे तर सामान्य लोकांच्या शंकांचे निराकरण करावे लागत आहे.

हेल्पलाईनचा नंबर लोकांना कसा मिळाला?

लोकसभी टीव्हीवर अनेकदा या हेल्पलाईनचा नंबर दाखवला जातो. त्यामुळे लोक हा नंबर पाहून या हेल्पलाईनवर फोन करत आहेत. यापैकी बहुतांश लोक ग्रामीण भागातील आहेत. हे लोक कसलीही भीडभाड न बाळगता आम्हाला मोदींचा नंबर द्या किंवा त्यांच्याशी भेट ठरवून द्या, अशी मागणी करतात.

कोरोनाची लस कधी मिळणार?

लोकसभा वाहिनी ग्रामीण आणि निमशहरी भागात लोकप्रिय आहे. त्यामुळे हेल्पलाईन क्रमांक दिसल्यावर अनेकांनी कोरोना लस कधी मिळणार, असे प्रश्नही विचारले. काही लोकांनी शेतकरी आंदोलनाबाबत सरकारची काय भूमिका आहे, असेही विचारून झाले. मात्र, ज्या खासदारांसाठी ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे त्यांनी याठिकाणी फोन करण्याची फार तसदी घेतलेली नाही. केवळ चार ते पाच खासदारांनीच या हेल्पलाईनवर फोन केल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितली.

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : पुण्यात पेट्रोल-डिझेल अधिभाराविरोधात मनसेचं आंदोलन

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका

Budget 2021: निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट; महाराष्ट्रासाठी काय?; आदित्य ठाकरेंचा सवाल

(Helpline for MP’s rural people get access now asks for PM Modi phone number)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.