AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : दादा 28 तारखेला गेला, नाहीतर 30 जानेवारीला… रेवतीच्या लग्नाबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांच्याशी निश्चित झाला आहे. सुप्रिया सुळेंनी ही आनंदाची बातमी अधिकृतरित्या जाहीर केली. अजितदादांच्या आशीर्वादानेच लग्न ठरल्याचे त्यांनी सांगितले. रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे, तर सारंग हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत. या लग्नामुळे सुळे कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.

Supriya Sule : दादा 28 तारखेला गेला, नाहीतर 30 जानेवारीला...  रेवतीच्या लग्नाबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
लेकीच्या लग्नाबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
| Updated on: Feb 12, 2026 | 12:21 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लौकरच लगीनघाई सुरू होणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे सुप्रिया व सदानंद सुळे यांची कन्या रेवती हिचं ठरलेलं लग्न, दोनच दिवसांपूर्वी ही बातमी समोर आली आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे सारंग लखानी यांचं लग्न ठरल्याची बातमी, सुप्रिया सुळे यांची मैत्रीण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केली होती. त्यांनी हे जाहीर केलय्वार रेवती प्रकाशझोतात आली. त्यानतंर काल खुद्द सुप्रिया सुळे यांनीच रेवती व सारंग यांचे काही फोटो पोस्ट करत लग्न ठरल्याची गुड न्यूज अधिकृतरित्या शेअर केली. सारगं हे नागपूरचे असून ते प्रसिद्ध उद्योजक अरूण व वंदना लखानी यांचे सुपुत्र आहेत. त्यानंतर संपूर्ण कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.

आज सकाळी सुप्रिया सुळे या माध्यमांशी संवाद साधत होत्या. रेवती व सारंग यांचं लग्न ठरल्याची घोषणा तुम्ही केली, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टच उत्तर दिलं.

अजित दादांच्या आशीर्वादाने ठरलं लग्न 

खरंतर अनेक महिने ही चर्चा चालू होती. रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतात. आणि माझं भाग्य आहे की मला सहा भाऊ आहेत, माझे सगळेच भाऊ, त्या सर्वांनी या नात्याला आशिर्वाद दिला. त्यामुळे मी हे माझं भाग्य समजते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरंतर हे दुर्दैवं आहे की दादा ( अजित पवार) आपल्यातून 28 (जानेवारी) तारखेलाचा गेला, नाहीतर ही (लग्न ठरल्याची) घोषणा, सगळी फॅमिलीच 30 तारखेला करणार होती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे एकाच गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतंय की, दादाच्या आशिर्वादानेच हे लग्न ठरलं, असही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

कोण आहे सारंग लखानी ?

शरद पवार यांचे होणारे नातजावई, रेवती हिचा होणारा पती सारंग लखानी हा मूळचा नागपूरचा आहे. व्यवसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत. सारंग स्वत:देखील उत्तम बॅडमिटंन खेळाडू असल्याचे समजते. तर रेवती सुळे यांच्या घरात राजकारणाचा मोठा वारसा असली तरी ती राजकारणापासून दूर असते. तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून मास्टर्स केलं आहे. रेवती आणि सारंग याचं लग्न ठरल्याची गुड न्यूज जरी समोर आली असली तरी त्याचं लग्न कधी, मुहूर्त कधीचा याविषयी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Follow Us
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा