Solapur : …ही आतषबाजी नाही! फटाक्यांच्या ट्रकवर कोसळली वीज; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरचा प्रकार, पाहा Video

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur-Pune National Highway) फटाक्यांच्या (Firecrackers) ट्रकवर वीज (Lightning) पडली. त्यानंतर फटाके फुटले. त्यामुळे ट्रक मात्र जळून खाक झाला आहे. माढा तालुक्यातील वरवडे टोलनाक्याजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली.

Solapur : ...ही आतषबाजी नाही! फटाक्यांच्या ट्रकवर कोसळली वीज; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरचा प्रकार, पाहा Video
वीज कोसळल्याने ट्रकमधील सर्व फटाके फुटले आणि ट्रक खाक झाला
Image Credit source: tv9
Pradeep Garad | Updated on: Apr 13, 2022 | 12:22 PM

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur-Pune National Highway) फटाक्यांच्या (Firecrackers) ट्रकवर वीज (Lightning) पडली. त्यानंतर फटाके फुटले. त्यामुळे ट्रक मात्र जळून खाक झाला आहे. माढा तालुक्यातील वरवडे टोलनाक्याजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली. महामार्ग पोलीस आणि टेभुर्णी पोलिसांनी तत्परतेने मदत करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचा फटाक्यांचा माल आणि ट्रक जळून खाक झाला आहे. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने फटाके घेऊन हा ट्रक चालला होता. चालत्या स्थितीत ट्रकवर वीज पडताच त्यातले फटाके फुटण्यास सुरुवात झाली. चालकाने प्रसंगावधानता राखून ट्रक महामार्गावरून बाजुला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पाहा व्हिडिओ

आणखी वाचा :

Hapus Mango : आंबा खवय्यांसाठी महत्वाची बातमी, वाढत्या उन्हाचा काय झाला परिणाम?

Nashik Crime: तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये भूमाफियांचा हैदोस; जमिनीच्या वादातून झालेली ही भयंकर मारहाण बघा…!

Summer Crop: उन्हाळी सोयाबीन बहरात असतानाच कृषी विभागाचा अंदाज काय? शेतकऱ्यांचा उद्देश होणार का साध्य?

Follow Us