आईच्या चितेच्या शेजारी मुलाची आत्महत्या, स्कॉर्पिओत स्वत:ला पेटवलं

लातूर: आईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने स्वत:ला स्कॉर्पिओ गाडीत पेटवून घेऊन, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. लातूर जिल्ह्यातल्या शिरुर ताजबंद शिवारात ही धक्कादायक घटना घडली. गजानन कोडलवाडे असं या तरुणाचं नाव आहे. तीन दिवसांपूर्वी गजानन यांच्या आईचा मृत्यू झाला होता, त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तीन दिवसानंतर त्याच चितेवर जावून, मुलानेही आत्महत्या केली. काल …

आईच्या चितेच्या शेजारी मुलाची आत्महत्या, स्कॉर्पिओत स्वत:ला पेटवलं

लातूर: आईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने स्वत:ला स्कॉर्पिओ गाडीत पेटवून घेऊन, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. लातूर जिल्ह्यातल्या शिरुर ताजबंद शिवारात ही धक्कादायक घटना घडली. गजानन कोडलवाडे असं या तरुणाचं नाव आहे.

तीन दिवसांपूर्वी गजानन यांच्या आईचा मृत्यू झाला होता, त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तीन दिवसानंतर त्याच चितेवर जावून, मुलानेही आत्महत्या केली. काल रात्री गजानन कोडलवाडे यांनी त्यांच्या आईच्या चितेजवळ स्कॉर्पिओ नेली आणि गाडीवर डिझेल टाकून पेटवले. धक्कादायक म्हणजे गजानन यांनी स्वत:ला गाडीत लॉक करून घेतले होते. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

व्यवसायाने खासगी वाहनचालक असलेल्या गजानन यांची दोन लग्न झाली होती. कौटुंबिक कलह वाढला होता. त्यातच त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने गजानन दुख:त होते. कौटुंबिक वादामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं अंदाज शिरूर-ताजबंद येथील नागरिक वर्तवतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *