Nashik | जिल्हा क्रीडा पुरस्काराने 4 खेळाडूंचा गौरव; पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप…!

| Updated on: Jan 27, 2022 | 10:58 AM

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.

Nashik | जिल्हा क्रीडा पुरस्काराने 4 खेळाडूंचा गौरव; पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप...!
नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान केले.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) जिल्हा क्रीडा पुरस्काराने (District Sports Award) 4 खेळाडू पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. प्रमाणपत्र , स्मृतिचिन्ह , रोख रुपये 10,000 / असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारांनी एक पुरूष खेळाडू , एक महिला खेळाडू , एक क्रीडा मार्गदर्शक व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण चार पुरस्कारार्थींना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते एका छोटेखानी समारंभात गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, तालुका क्रीडा अधिकारी संजिवनी जाधव, क्रीडा अधिकारी महेश पाटील, प्रकाश पवार, अविनाश टिळे, संदीप ढाकणे, माजी आमदार जयवंत जाधव तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी ऊपस्थित होते .

एकूण 18 अर्ज प्राप्त

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत खेळाडू पुरुष, महिला आणि दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यासाठी जिल्हाभरातून अर्ज मागविण्यात आले होते. यात गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी 15, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 01 व दिव्यांग खेळाडू पुरस्कारासाठी 02 असे एकूण 18 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जांची जिल्हा क्रीडा पुरस्कार छाननी समिती मार्फत छाननी करण्यात आली असून, यात एक पुरूष खेळाडू एक महिला खेळाडू एक क्रीडा मार्गदर्शक व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण चार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव केल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले. दरम्यान, सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा दिल्या आहेत.

या खेळाडूंचा झाला गौरव

1) गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला
– ऐश्वर्या सुधाकर शिंदे
– दौलत नगर, सोयगाव ता. मालेगाव
– बेसबॉल

2) गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष
– रवींद्र ज्ञानेश्वर कडाळे
– मु. पो. पाचोरे वणी, ता. निफाड
– कॅनोईंग व कयाकिंग

3) गुणवंत खेळाडू पुरस्कार
– दिव्यांग खेळाडू
– गौरी सुनील गर्जे
– सातपूर, नाशिक
– पॅरा जलतरण

4) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
– शरद भास्करराव पाटील
– पंचवटी, नाशिक
– कबड्डी

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!