स्टेट बँकेच्या कॅशिअरने वृद्ध महिलेचं पासबूक फाडून तोंडावर फेकलं

अमरावती: पासबूक अपडेट करण्याची विनंती करणाऱ्या वृद्ध महिलेचं पासबूक फाडून कॅशिअरने तिच्याच तोंडावर फेकल्याचा आरोप आहे. अमरावतीत हा प्रकार घडला  आहे.  अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील रमाबाई वरघट या स्टेट बँकेत गेल्या होत्या. त्यांनी कॅशिअरला पासबूक भरुन देण्याची विनंती केली. मात्र कॅशिअरने पासबूक फाडून तोंडावर फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे कॅशिअरचं निलंबन करण्याची मागणी होत […]

स्टेट बँकेच्या कॅशिअरने वृद्ध महिलेचं पासबूक फाडून तोंडावर फेकलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अमरावती: पासबूक अपडेट करण्याची विनंती करणाऱ्या वृद्ध महिलेचं पासबूक फाडून कॅशिअरने तिच्याच तोंडावर फेकल्याचा आरोप आहे. अमरावतीत हा प्रकार घडला  आहे.  अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील रमाबाई वरघट या स्टेट बँकेत गेल्या होत्या. त्यांनी कॅशिअरला पासबूक भरुन देण्याची विनंती केली. मात्र कॅशिअरने पासबूक फाडून तोंडावर फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे कॅशिअरचं निलंबन करण्याची मागणी होत आहे.

पण कॅशिअरने थेट पासबूक का फाडलं? त्याला इतका राग का आला? संबंधित महिला त्याला काही बोलली का हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. दरम्यान, याप्रकारानंतर वृध्देने तळेगाव पोलीस स्टेशनला याबाबत लेखी तक्रार दिली आहे.

रमाबाई वरघट यांचे स्टेट बँकेच्या घुईखेड शाखेत बचत खाते आहे. या खात्यामध्ये त्यांना एका सरकारी योजनेचे पैसे येत असल्यामुळे, त्या पैसे आले की नाही याची खात्री करण्याकरिता घुईखेड स्टेट बँकेत गेल्या होत्या. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला.

यापूर्वी सुध्दा याच कॅशिअरच्या अनेक तक्रारी आल्या. परंतु त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. हा कॅशिअर विनाकारण बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या शाखेत कॅशिअरची हिटलरशाही सुरु असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.