कधीकाळी गंभीर आरोप करणाऱ्या कांदेंबद्दल भुजबळ काय म्हणाले? कांदे यांचं कौतुक केलं की कानपिचक्या घेतल्या

| Updated on: Nov 17, 2022 | 7:44 AM

कांदे आणि भुजबळ यांच्यातील वाद राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला असताना कांदे यांच्याबद्दल छगन भुजबळ यांनी एक सूचक विधान केले आहे.

कधीकाळी गंभीर आरोप करणाऱ्या कांदेंबद्दल भुजबळ काय म्हणाले? कांदे यांचं कौतुक केलं की कानपिचक्या घेतल्या
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पण, यावर स्वतः छगन भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील राजकारणात काही महिन्यांपूर्वी भुजबळ आणि कांदे यांच्यातील संघर्ष चर्चेचा विषय ठरला होता, इतकंच काय तर तो वाद न्यायालयात देखील जाऊन पोहचला होता, सुहास कांदे यांनी भुजबळ यांच्यावर विविध आरोप करत नियोजन समितीत कसा घोटाळा केला हे सांगण्याचे काम कांदे यांनी केले होते. त्यातच काही महीने उलटत नाही तोच राज्यात राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यात कांदे हे शिंदे गटात गेले होते. त्यात आता सुहास कांदे हे सक्षम, कार्यसम्राट आमदार असून त्यांच्याकडे भुसेनी लक्ष द्यायला पाहिजे, असे सूचक वक्तव्य भुजबळ यांनी केले.

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात महाविकास आघाडी सरकार असतांना टोकाचे वाद झाले होते.

गुन्हेगारी विश्वाचे प्राचार्य तर अगदी विद्यार्थी इथपर्यंत कांदे आणि भुजबळ यांनी आरोप केले होते, कांदे यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देऊन भुजबळांनी कसा खंजीर खुपसला हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला होता.

हे सुद्धा वाचा

यावेळी जेष्ठ नेते असलेल्या भुजबळांनी वाढता विरोध लक्षात घेता, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्वतःच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती.

एकूणच कांदे आणि भुजबळ यांच्यातील वाद राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला असताना कांदे यांच्याबद्दल छगन भुजबळ यांनी एक सूचक विधान केले आहे.

सुहास कांदे हे सक्षम, ते कार्यसम्राट आमदार आहेत, त्यांच्याकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष दिले पाहिजे असं विधान करून भुजबळ यांनी केलं खरं पण हे कौतुक होतं की कानपिचक्या यावरून आता नाशकात चर्चा रंगू लागल्या आहेत.