Sujat Ambedkar : ‘अमित ठाकरेंना हनुमान चालिसा बोलायला लावा, तिकडे एकही बहुजन मुलगा नको’
राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यावर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलाला सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Amit Thackeray) यांनी खरपूस समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यावर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं. मशिदींवर मोठ्या आवाजात भोंगे लावले, तर मी तिथे हनुमान चालीसा म्हणायला लावेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर सुजात यांनी निशाणा साधत राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली आहे. तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम दंगलीवर उभा नका करू, एवढी कळकळीची विनंती आहे, असेही ते म्हणाले.
Published on: Apr 03, 2022 05:42 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

