क्लस्टर प्रकल्प, 5 कोटींची डिल अन् मिनाक्षी शिंदे; पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे हादरवणारे आरोप

प्रदिप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी मिनाक्षी शिंदे यांना पत्रकार परिषद घेण्यावरून आक्षेप घेतला.

क्लस्टर प्रकल्प, 5 कोटींची डिल अन् मिनाक्षी शिंदे; पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे हादरवणारे आरोप
sushma andhare news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 12:46 PM

ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वत: ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी न्यायमिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा दिला. ठाकरेंनंतर आता सुषमा अंधारे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहे. कडवट शिवसैनिक पुर्णेकर कुटुंबीयांसोबत ठामपणे उभा आहे.  हे नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नुकसान आहे.  दोन आरोपींना अटक झाली आहे. अद्याप काहींना अटक झालेली नाही. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक झाली नाही. ठाणे आनंद दिघे यांचे ठाणे म्हणून ओळखलं जाते. परंतु धर्मवीरांच्या आश्रमात त्यांच्या गटातील लोकांची दारू पिऊन धिंगाणा करण्यापर्यंत मजल जाते. मुलगा रामने पहिल्या दिवशी जबाबामध्ये मीनाक्षी शिंदे यांचे नाव स्पष्टपणे घेतले आहे. मीनाक्षी शिंदे वेड पांघरुण पेड गावला जात आहेत’.

Loading...

अंधारेंचा मिनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप  

‘पूर्णेकर प्रकरणात क्लस्टरचा मुद्दा होता. पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांच्या घोटाळ्याविरोधात आवाज उचलला होता. मीनाक्षी शिंदे मूळच्या कर्नाटकच्या. त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. तर व्हायरल ऑडिओ क्लिपवर मीनाक्षी शिंदे यांचे म्हणणे आहे की हा AI ऑडिओ आहे. मग 8 महिन्यापूर्वी सायबर पोलिसांकडे तक्रार का नाही केली.  जो मुलगा बोलत आहे, त्याची चौकशी केली का नाही? मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे, टल्ल्या हे सगळे पवारनगर इथे भेटले होते. या लोकांच्या संदर्भात काय ती माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. पाच  कोटींचा व्यवहार झाला आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. पंधरा दिवसापासून रेकी सुरू होती. हॉटेल महाराजाचे सीसीटीव्ही फुटेज काढा, असे अंधारेंनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us