Teacher Constituency Election : शिक्षक मतदारसंघात महायुतीसहित विरोधकांच्या ताकदीची कसोटी लागणार; पुणे, अमरावतीत कोण गेमचेंजर ठरणार?

महाराष्ट्रातील शिक्षक मतदारसंघात महायुतीसहित विरोधकांच्या ताकदीची कसोटी लागणार आहे. राज्यातील पुणे, अमरावतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.

Teacher Constituency Election : शिक्षक मतदारसंघात महायुतीसहित विरोधकांच्या ताकदीची कसोटी लागणार; पुणे, अमरावतीत कोण गेमचेंजर ठरणार?
Teacher constituency election
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 10:43 AM

राज्यातील पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. त्यानंतर आता दोन्ही जागांवर महायुतीसहीत विरोधकांची कसोटी लागणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार आहेत. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात 26 उमेदवार आहेत. पुणे, अमरावती मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांच्या पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

पुण्यात कोण सरस ठरणार?

Loading...

विधान परिषदेच्या 5 जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ हा 6 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर , अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपणार आहे. पुण्यातील शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. जयंत आसगावकर काँग्रेसकडून लढत आहेत. तर भाजपकडून कौस्तुभ गावडे हे मैदनात उतरले आहेत. पुण्यातील शिक्षक मतदारसंघात महायुतीतून शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनी जोरदार प्रयत्न केले. परंतु ऐनवेळी मंगश चिवटे यांनी अर्ज मागे घेतला. पुढे सचिन सानप यांना शिंदे गटाने पाठिंबा दिला. तर दत्तात्रय सावंत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. सर्वांचं लक्ष असलेल्या पुण्यातील शिक्षक मतदारसंघात एकूण 61940 मतदार आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात एकूण 35810 मतदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडून अदिती पोहरे, ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने, शिंदेंच्या  शिवसेनेकडून  किरण सरनाईक, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून दिलीप कडू रिंगणात आहेत. या मतदारसंघात बंडखोरी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे शेखर भोयर देखील रिंगणात आहेत. तसेच भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय सुमित पवार देखील मैदानात उतरले आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहीण संगिता शिंदे नशीब आजमावत आहेत.

अमरावतीतही काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या मतदारसंघात उमेदवाराचा फोकस हा अमरावती, बुलढाणा जिल्ह्यावर आहे.  अमरावतीत 26 उमेदवार रिंगणात असून उद्या उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या मतादरासंघात 35 हजार 810 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 27 ऑक्टोबर रोजी लोकशाही भवनात 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us