लेकीच्या अंगावरील वर्दी पाहून शेतकरी आई-वडील गहिवरले, नाशिकची तेजल आहेर मुंबईत PSI पदी रुजू होणार

तेजल आहेर ही पोलीस दलात उपनिरीक्षकपदी मुंबई येथे 7 एप्रिल रोजी रुजू होणार आहे. Tejal Aaher

लेकीच्या अंगावरील वर्दी पाहून शेतकरी आई-वडील गहिवरले, नाशिकची तेजल आहेर मुंबईत PSI पदी रुजू होणार
तेजल आहेर

नाशिक: आई-बाप शेतकरी त्यातच घरची परिस्थिती हालाखीची, कसलाच क्लास न लावता स्वतःच्या हिमतीवर अभ्यास सुरू केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी नाशिक येथे राहून केली आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवलं. ही गोष्ट निफाड तालुक्यातील तेजल आहेर या तरुणीची आहे. तेजल आहेर 15 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करुन गावात परतली आणि कष्टकरी आई- वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तेजल आहेर जेव्हा पंधरा महिने यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करुन पोलीस वर्दीत निफाड तालुक्यातील वाहेगाव भरवस येथे घरी परतली तेव्हा तिचं स्वागत कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी जल्लोषात केलं. ग्रामस्थांनी तेजल आहेरच्या जिद्द आणि मेहनतीला सलाम ठोकला. तेजल ही पोलीस दलात उपनिरीक्षकपदी मुंबई येथे 7 एप्रिल रोजी रुजू होणार आहे. (Tejal Aaher join Maharashtra Police Force as PSI after successfully completed training)

2017 मध्ये परीक्षेत उत्तीर्ण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2017 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी तेजल आहेर पात्र ठरली. निफाड तालुक्यातील वाहेगाव भरवस हे तेजल आहेर हिचे गाव आहे. गावामध्ये तिचे आई आणि वडील शेती करतात. आयोगामार्फत निवड झाल्यानंतर तिचं नाशिक येथे पोलीस अकदामीत प्रशिक्षण झाले. नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीत पंधरा महिने यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून दीक्षान्त सोहळ्यानंतर रात्री उशिरा घरी आगमन झाले. ग्रामस्थांनी तिचं जल्लोषात स्वागत केले.

स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली?

तेजल आहेर स्पर्धा परीक्षेच्या तयारी बद्दल बोलताना सांगतात की, गावामध्येच प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर विचूंरला अकरावी आणि बारावीचं शिक्षण घेतल. नूतन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर नाशिकला जाऊन तयारी सुरु केली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं क्लासेस लावता येणार नव्हते. त्यामुळे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अभ्यास केला. अभ्यासाच्या काळात सण आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं टाळलं. आई वडील, मित्र मैत्रिणी आणि ग्रामस्थांनी त्या काळात मदत केली, त्यामुळेच यश मिळवता आले.

मुंबईत सेवेत रुजू होणार

तेजल आहेर यांनी स्वयंअध्ययन करून शेतीकाम सांभाळून पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. नाशिकला 7 जानेवारी 2020 ला प्रशिक्षणास प्रारंभ केला. मध्यंतरी आलेल्या कोरोना संकटामुळे प्रशिक्षण लांबल्याने पंधरा महिने प्रशिक्षण चालले. आई-वडिलांचा शेती व्यवसाय असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची, प्रतिकूल असली तरीही आई- वडिलांचे नेहमी पाठबळ लाभले, असं तेजल आहेर सांगतात. मुलीला वर्दीत बघायचे आमचे स्वप्न अखेर साकार झाले, असं तेजल यांचे वडील हौशीराम आहेर यांनी सांगितलं आहे. ते सांगता तेजलनं शु्न्यातून जग निर्माण केलं. तेजलचा आम्हाला आणि गावाला अभिमान आहे. ज्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा ती शेतात काम करत होती, असंही ते म्हणाले. तेजल आहेर 7 एप्रिलला मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होत आहेत.

संबंधित बातम्या:

“आबांनंतर आदर्श गृहमंत्री, भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांचा राजीनामा”

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची, लोकशाही चाड असेल संसदेत चर्चा व्हावी, शिवसेनेची मागणी

(Tejal Aaher join Maharashtra Police Force as PSI after successfully completed training)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI