AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवरायांचा अवमान भोवला, श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या सुनावणीत श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय झाला

छत्रपती शिवरायांचा अवमान भोवला, श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका
| Updated on: Feb 28, 2020 | 1:12 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली आहे. (Thackeray Govt slams Shripad Chhindam)

तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचं पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झाली.

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर आणि भाजपच्या तिकीटावर त्यावेळी नगरसेवकपदी निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता. (Thackeray Govt slams Shripad Chhindam)

छिंदमने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. परंतु मतदारांनी नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला नाही.

हेही वाचाखासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचा पाय आणखी खोलात, प्रशासनानेही कंबर कसली

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.