AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राष्ट्रवादीवाले xxची औलाद’, मनसेच्या अमेय खोपकर यांची जीभ घसरली

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली.

'राष्ट्रवादीवाले xxची औलाद', मनसेच्या अमेय खोपकर यांची जीभ घसरली
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 08, 2022 | 9:12 PM
Share

ठाणे : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याची बातमी ताजी असताना आता आणखी एक तशीच बातमी समोर आलीय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत”, अशा अर्वाच्य भाषेत अमेय खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल ठाण्याच्या एका मॉलमधील चित्रपटगृहात शिरुन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला होता. यावेळी एका प्रेक्षकाला प्रचंड मारहाण झाल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पण त्या प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती का? ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

या दरम्यान संबंधित घटनेवर मनसेकडून टीका करण्यात आलीय. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी बंद केलेला शो पुढच्या अर्ध्या तासात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुरु केला होता.

माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेतलाय. त्यानंतर राज्यातील सर्व मराठा संघटनांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागलीय. या सगळ्या गदारोळादरम्यान जितेंद्र आव्हाडांनी थेट चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर या चित्रपटावरुन मनसे आणि राष्ट्रवादी संघर्ष बघायला मिळाला.

मनसेकडून जितेंद्र आव्हाड यांच्या शो बंद पडण्याच्या कृत्याला आव्हान देण्यासाठी आज संध्याकाळी त्याच चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता. यावेळी अमेय खोपकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खालच्या पातळीची टीका केली.

“तुम्ही आमच्या एका मराठी प्रेक्षकाला त्याच्या परिवारासमोर तुम्ही दहा-पंधरा जण मारतात? राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत. या लोकांना लाजा नाही वाटतं?”, असा घणाघात अमेय खोपकरांनी केला.

“अमोल मिटकरींना ध्यानात ठेवायचं. त्यांनी काल मला चॅलेंज केलं होतं ना? त्यांचं चॅलेंज स्वीकारलंय. हर हर महादेव चित्रपट पाहण्यासाठी आज ठाण्यात आलोय आणि हा चित्रपट पाहतोय. उगाच जातीपातीचं राजकारण करायचं. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे”, असं अमेय खोपकर म्हणाले.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा