भिवंडीत अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चिमुरड्याची अपहरण करून हत्या

आरोपी जितेंद्र हा हत्या केलेल्या कुटुंबाकडे खानावळ लावून जेवण करण्यासाठी येत होता. यावेळी तो मयत मुलाच्या आईसोबत शारीरीक लगट करायचा. ही गोष्ट मुलाने आपल्या वडिलांना सांगितल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याची खानावळ बंद केली.

भिवंडीत अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चिमुरड्याची अपहरण करून हत्या
भिवंडीत अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चिमुरड्याची अपहरण करून हत्या

भिवंडी : अनैतिक संबंधात अडसर असल्याने आठ वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करुन नंतर हत्या केल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीत घडली आहे. खानावळीसाठी घरी येणाऱ्या कामगाराचे मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. याच संबंधातून हे अपहरण आणि हत्याकांड घडले. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अधिक तपास करीत आरोपीला अटक केली आहे. (Kidnapping and murder of an eight-year-old boy in an immoral relationship in bhiwandi)

भिवंडीतील कारीवली गावातील घटना

भिवंडी तालुक्यातील कारीवली गावच्या हद्दीतील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील 8 वर्षाचा मुलगा हा काल दुपारपासून बेपत्ता होता. त्यानंतर परीसरात खूप शोधाशोध केली. मात्र तरीही मुलगा न सापडल्याने त्याच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका बंद खोलीत आढळून आला. मुलाची गळा आवळून हत्या करीत मृतदेह तेथे टाकण्यात आला होता.

मुलाने अनैतिक संबंधाबाबत वडिलांना सांगितल्याच्या रागात हत्या

भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. तपासादरम्यान परिसरातील संशयित जितेंद्र मधेशिया यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबुल केले. आरोपी जितेंद्र हा हत्या केलेल्या कुटुंबाकडे खानावळ लावून जेवण करण्यासाठी येत होता. यावेळी तो मयत मुलाच्या आईसोबत शारीरीक लगट करायचा. ही गोष्ट मुलाने आपल्या वडिलांना सांगितल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याची खानावळ बंद केली.

मुलाने आपले कारस्थान सांगितल्याने आपले बिंग फुटले याचा राग मनात ठेवून जितेंद्र याने आठ वर्षीय चिमुरड्यास खेळायच्या बहाण्याने बोलवून आपल्यासोबत चौथ्या मजल्यावर नेले. तेथे नेल्यावर त्याची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चिमुरड्याची हत्या करणारा जितेंद्र मधेशिया यास अवघ्या अठरा तासात अटक केली. आरोपीला भिवंडी न्यायालयात हजर केले असता आरोपीस 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kidnapping and murder of an eight-year-old boy in an immoral relationship in bhiwandi)

इतर बातम्या

नारायणगाव बायपासचं काम पूर्ण, पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट, गडकरींची ट्विट करत माहिती

फोर्ड ग्राहकांना धक्का, कंपनी भारतीय मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स बंद करण्याच्या विचारात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI