AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane : जोगिला तलाव बाधितांचे पुनर्वसन न केल्यास अधिकार्‍यांना दालनात कोंडणार, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा इशारा

31 मे 2018 रोजी या तलावाचे पुनर्जीवन करण्याच्या नावाखाली येथील घरे ठाणे पालिकेने जमीनदोस्त केली. तत्पूर्वी, या सर्व नागरिकांचा बायोमेट्रिक सर्व्हे देखील करण्यात आला होता. या नागरिकांनी त्यावेळी कारवाईला आक्षेप घेतल्यानंतर तत्कालीन परिमंडळ उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या सहीचे पत्र देऊन, जोगिला मार्केट प्रभाग समितीची इमारत पाडून त्याच ठिकाणी तलाव सुशोभिकरणातील बाधितांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

Thane : जोगिला तलाव बाधितांचे पुनर्वसन न केल्यास अधिकार्‍यांना दालनात कोंडणार, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा इशारा
जोगिला तलाव बाधितांचे पुनर्वसन न केल्यास अधिकार्‍यांना दालनात कोंडणार
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 12:35 AM
Share

ठाणे : जोगिला तलावा(Jogila Lake)च्या पुनर्वसनासाठी परिसरातील नागरिकांना बेघर करण्यात आले होते. मात्र, चार वर्षानंतरही त्यांचे सुनियोजीत पद्धतीने पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या नागरिकांना जोगिला मार्केट परिसरातच पुनर्वसन करण्याबाबत लेखी पत्र देऊनही त्यांना आता बीएसयूपीच्या ब्रम्हांड येथील इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे बाधीत नागरिकांची फसवणूक असून सदर रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याचा निर्णय न घेतल्यास ठामपा अधिकार्‍यांना त्यांच्या दालनामध्येच कोंडून ठेवू, असा इशारा विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण (Ashraf Shanu Pathan) यांनी दिला आहे. उथळसर प्रभाग समिती इमारतीच्या शेजारी जोगिला तलाव असून या तलावाच्या आजूबाजूला सुमारे 357 झोपड्या होत्या. सदरचा भूखंड शासकीय मालकीचा असून अनेक नागरिक ठाणे महानगर पालिकेचा कर भरत आहेत. (Leader of Opposition in Thane Municipal Corporation Shanu Pathan’s warning regarding rehabilitation of Jogila Lake victims)

तलावाचे पुनर्जीवन करण्याच्या नावाखाली पालिकेने ही घरे जमीनदोस्त केली

31 मे 2018 रोजी या तलावाचे पुनर्जीवन करण्याच्या नावाखाली येथील घरे ठाणे पालिकेने जमीनदोस्त केली. तत्पूर्वी, या सर्व नागरिकांचा बायोमेट्रिक सर्व्हे देखील करण्यात आला होता. या नागरिकांनी त्यावेळी कारवाईला आक्षेप घेतल्यानंतर तत्कालीन परिमंडळ उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या सहीचे पत्र देऊन, जोगिला मार्केट प्रभाग समितीची इमारत पाडून त्याच ठिकाणी तलाव सुशोभिकरणातील बाधितांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. हे पुनर्वसन होण्यापूर्वी सदर नागरिकांना एक्मे ओझोन, मानपाडा येथील एमएमआरडीएच्या रेंटल इमारतीमध्ये तात्पुरता निवारा दिला आहे. या ठिकाणी नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यानंतर 27 जानेवारी रोजी या नागरिकांना ब्रम्हांड येथील बीएसयूपीच्या पुनर्वसन करण्यासंदर्भात ताबा पत्र दिले आहे. मात्र, त्याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. या नागरिकांनी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांची भेट घेतली. पठाण यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर उपस्थित होते.

शानू पठाण यांचा ठाणे महापालिका प्रशासनाला इशारा

ठाणे महानगर पालिकेने जोगिला मार्केट परिसरातील नागरिकांची फसवणूक केली आहे. तलावाच्या पुनर्जीवनाच्या नावाखाली या ठिकाणी व्यावसायिक धोरण आखले आहे. या नागरिकांचे जोगिला तलाव परिसरातच पुनर्वसन करण्याचे पत्र देऊनही त्यांचे सुनियोजीत पुनर्वसन केलेले नाही. जर, या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत ठामपा अधिकार्‍यांनी योग्य नियोजन केले नाही. तर, आपण बाधितांसह पालिका मुख्यालयातील संबंधित अधिकार्‍यांच्या दालनाबाहेर घेराव घालून त्यांना कोंडून ठेवू, असा इशारा शानू पठाण यांनी दिला आहे. (Leader of Opposition in Thane Municipal Corporation Shanu Pathan’s warning regarding rehabilitation of Jogila Lake victims)

इतर बातम्या

Thane Mahapalika : करदात्यांनी मालमत्ता कर तात्काळ जमा करण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन

Viral Video : रेल्वेच्या जागेवर कारवाई करण्यास गेलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला समाज सेवकाकडून शिवीगाळ, व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.