AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत महारक्तदान शिबिराचं आयोजन, नागरिकांच्या मतदानाप्रमाणं रक्तदानासाठी रांगा

वसईमध्ये मंदिर,मस्जिद,चर्च, गुरुद्वारा, बौद्ध विहार मध्ये एकाच वेळी हे रक्तदान शिबीर संपन्न झाले आहे. Vasai Blood Donation Camp

वसईत महारक्तदान शिबिराचं आयोजन, नागरिकांच्या मतदानाप्रमाणं रक्तदानासाठी रांगा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 20, 2020 | 5:35 PM
Share

पालघर- वसईला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. राज्यातील रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर वसईत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वसईत समाधान फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थानी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात वसईकरांनी मोठा सहभाग नोंदवून, आजचा रविवार रक्तदान महोत्सव म्हणून साजरा केला आहे. वसईमध्ये मंदिर,मस्जिद,चर्च, गुरुद्वारा, बौद्ध विहार मध्ये एकाच वेळी हे रक्तदान शिबीर संपन्न झाले आहे. वसईतील 50 पेक्षा जास्त सामाजिक संस्था आणि मंडळे, राजकीय पक्ष यांनी प्रत्येकाने छोटेमोठे रक्तदान शिबीर आयोजित करून निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. (Maha Blood Donation Camp organized at Vasai)

रक्तदानासाठी रांगा

वसई पश्चिम गुरुद्वारामध्ये तर अक्षरक्ष: लोकशाहीचा उत्सव साजरा करताना ज्या प्रमाणे मतदानाला मतदारांच्या रांगा असतात त्याप्रमाणे रक्तदात्यांनी रांगा लावून रक्तदान केले आहे. या रक्तदात्या मध्ये तृतीयपंथी, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, व्यायाम शाळेतील तरुण, महिला, पुरुष यांनी आपला सहभाग नोंदविला होता.

वसईला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. तोच वारसा जपण्यासाठी जात, धर्म, पंथ सोडून एक मानवतेचा धर्माची शिकवण देण्यासाठी आज वसईकरांनी रक्तदान महोत्सवातून आपल्या एकतेचे दर्शन घडविले आहे. कोणताही धर्म एकमेंकामध्ये वैर निर्माण करण्याचं शिकवत नाही. माणुसकीच्या भावनेतून रक्तदान शिबीर आयोजित केल्याचं वसईतील समाधान फाऊंडेशनचे अध्यक्ष फजल कुरेशी यांनी सांगितले.

बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी देखील रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्या सर्व संस्थांना धन्यवाद दिले आहेत. रक्ताचा तुटवडा जाणवू नये, म्हणून दर पंधरा दिवसांनी शिबीर आयोजित करण्याचा विचार असल्याचे त्यांनी संगितले. (Maha Blood Donation Camp organized at Vasai)

एकाच वेळी 20 ठिकाणी रक्तदान शिबीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सरकारच्यावतीनं मार्फत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत वसईतील समाधान फाउंडेशनने वसईत एकाच वेळी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा मध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन केलं. सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत एकाचवेळी 20 ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडलं.

कलाकारांचे रक्तदानाचे आवाहन

रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन,रक्तदान करावे असे आवाहन वसईचे आ. हितेंद्र ठाकूर, वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरण. डी, अभिनेता भाऊ कदम, अभिनेत्री प्राजक्ता नावणारे, मीनाक्षी कोसे, अभिनेता शंतनू गगने, सायली पराडकर यांच्यासह अनेक सिनेकलावंतांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. (Maha Blood Donation Camp organized at Vasai)

संबंधित बातम्या:

गोपीनाथ गडावर पंकजा, प्रीतम मुंडे, भजन ते रक्तदान, काय काय घडलं?

राज्यात आठवडाभर पुरेसाच रक्तसाठा, मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

(Maha Blood Donation Camp organized at Vasai)

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट