AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला शो मनसेकडून सुरु, ठाण्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन प्रचंड संघर्ष

'हर हर महादेव' चित्रपटावरुन ठाण्यात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळतोय.

जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला शो मनसेकडून सुरु, ठाण्यात 'हर हर महादेव' चित्रपटावरुन प्रचंड संघर्ष
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 07, 2022 | 11:14 PM
Share

ठाणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन ठाण्यात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये गेले. या मॉलमधील चित्रपटगृहात प्रवेश करुन त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यांनी सर्व प्रेक्षकांना थिएटरच्या बाहेर काढलं. यावेळी एका प्रेक्षकासोबत हाणामारी झाल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झालंय. जितेंद्र आव्हाड शो बंद पाडून मॉलमधून बाहेर पडल्यानंतर तिथे मनसे नेते अविनाथ जाधव कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये दाखल झाले. त्यांनी बंद पाडलेला चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“जितेंद्र आव्हाड काही सेन्सॉर बोर्ड नाही. लोकांनी घाबरायची गरज नाही. मनसे तुमच्यासोबत आहे. संस्कृकतीची वार्ता करणाऱ्यांनी अशाप्रकारे येऊन प्रेक्षकांना मारणं ही कोणती संस्कृती आहे? हे आम्हाला पटवून सांगा”, असं अविनाश जाधव म्हणाले.

“मागच्यावेळी तुम्ही तुमच्या बंगल्यात घेऊन जाऊन एकाला मारलं होतं तेच आज इथे येऊन केलं. नक्की तुम्ही बदलत नाही आहात. तुम्ही लोकांना गृहीत धरत आहात”, असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला.

“हा चित्रपट सुरु होऊन नऊ-दहा दिवस झाले. काहीतरी स्टंट मारु नका. महाराष्ट्राचे प्रेक्षक तुम्हाला माफ करणार नाही. राज ठाकरे प्रेक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत”, असंदेखील ते म्हणाले.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?