Mira Road : मीरा रोडमध्ये कुर्बानीच्या बकऱ्याच्या शेडवरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये राडा, ब्लेडने हल्ला

Mira Road : बकरी ईद आधी मुंबईच्या मीरा रोडमध्ये मोठा राडा झाला आहे. कुर्बानीच्या बकऱ्याच्या शेडवरुन हिंद-मुस्लिम भिडले. भाजपच्या सात आमदारांनी आणि मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसह एक डझनपेक्षा जास्त नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

Mira Road : मीरा रोडमध्ये कुर्बानीच्या बकऱ्याच्या शेडवरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये राडा, ब्लेडने हल्ला
Mira Road
| Updated on: May 26, 2026 | 10:29 AM

बकरी ईद जवळ येतेय. त्यावरुन राजकारण सुद्धा जोरात सुरु झालं आहे. मु्ंबईत भाजपने बकऱ्यांच्या मुद्यावरुन काही पावलं उचलली आहेत. भाजपच्या सात आमदारांनी आणि मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसह एक डझनपेक्षा जास्त नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. पत्र लिहिणाऱ्या भाजपं आमदारांमध्ये पराग शाह, मनीषा चौधरी, अतुल भातखळकर, मिहिर कोटेचा यांचा समावेश आहे. माजी खासदार किरीट सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांनी सुद्धा महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी रहिवाशी संकुल, हाऊसिंग सोसायटी आणि चाळीत बकऱ्यांची कुर्बानी देण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

मुंबईच्या कुठल्याही हाऊसिंग सोसायटीत बकऱ्याच्या कुर्बानीला परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. सोसायटीत बकऱ्याच्या कुर्बानीमुळे इतर धर्मीयांना त्रास होतो असं पत्रात लिहिलं आहे. मुंबईला लागून असणाऱ्या मीरा रोडमध्ये बकरी ईदवरुन मोठा वाद झाला आहे. मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीत बकऱ्यांसाठी एक शेड बांधण्यात आलेली. या शेडच्या पाडकामावरुन वाद झाला.

हाणामारी सुद्धा झाली

ही शेड मुस्लिम धर्माच्या लोकांनी बांधली होती. कुर्बानीच्या बकऱ्यांसाठी ही शेड बांधण्यात आलेली. हिंदू पक्षाच्या तक्रारीनंतर स्थानिक नगर पालिकेने इथे येऊन डिमोलिशन केलं. त्यानंतर पुन्हा ही शेड बांधण्याची प्रक्रिया सुरु झाली असा आरोप आहे. रात्री काही हिंदू संघटनांचे लोक तिथे एकत्र जमले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली. हाणामारी सुद्धा झाली. हल्ला सुद्धा झाला.

हिंदू युवकावर ब्लेडने हल्ला

काल दुपारी हिंदू संघटना आणि इमारतीत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर कुर्बानीच्या बकऱ्यांसाठी बांधण्यात आलेली शेड पाडण्यात आली. हे पाडकाम सुरु असताना मुस्लिम समुदायाच्या लोकांनी विरोध प्रदर्शन सुरु केलं. या प्रकरणी काशीमीरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत केलं होतं. पण रात्री पुन्हा वाद झाला. हाणामारीपर्यंत विषय जाऊन पोहोचला. मुस्लिम पक्षाने एका हिंदू युवकावर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. सध्या घटनास्थळी पोलीस पथक तैनात आहे.

Follow Us