AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम हिंदू हो क्या… म्हणत हल्ला करणाऱ्या जैबने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती; मला कुणीच…

मीरा रोड येथे घडलेल्या घटनेमुळे सध्या मुंबईत खळबळ माजली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने खळबळजनक वक्तव्य केले आहे.

तुम हिंदू हो क्या... म्हणत हल्ला करणाऱ्या जैबने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती; मला कुणीच...
Mira RoadImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 28, 2026 | 5:01 PM
Share

मुंबईतील मीरारोड येथे रविवारी सकाळी खळबळजनक घटना घडली. जैब झुबेर अन्सारी या तरुणाने इमारती दोन सुरक्षारक्षकावर हल्ला केला. तुम हिंदू हो क्या? तुमको कलमा आता है क्या? तुम नमाज पठते हो क्या? असा प्रश्न विचारल्यानंतर जैबने सुरक्षारकांवर धारधार चाकूने सपासप वार केले. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करण्यात आली. तसेच हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्यात आले. आता आरोपीची चौकशी करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चाकुहल्ला करणारा आरोपी जैब झुबेर अन्सारी अटकेवेळी घरात एकटाच बसला होता. आरोपी राहत असलेल्या अस्मिता रिझेन्सी सोसायटीतून त्याला 22 तारखेला रूम खाली करण्याच्या दिल्या होत्या सूचना. बॅचलर राहत असल्यामुळे त्याला नोटीस पाठवण्यात आली होती. अटकेनंतर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपीने मोठा दावा केला असल्याची माहिती.

“मला भाड्याने रूम कोणी देत नाही, मला कोणी नीट वागवत नाही, माझ्याशी नीट कोणी बोलत नाही”, असे आरोपीकडून प्राथमिक चौकशीत दावे करण्यात आले आहेत. परदेशातून भारतात आरोपी आल्याने गांभीर्य ओळखून तपास एटीएसकडे.

जैब झुबेर अन्सारी

आरोपी जैब जुबेर शेखने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू पोलिसानी जप्त केला. आरोपीच्या घरातून मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसानी केले जप्त. आरोपीच्या घरात कपडे आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत असल्याची पोलिसांची माहिती. आरोपीचे राहणीमान आणि एकूणच वर्तन पाहता बऱ्याच काळापासून आरोपी एकटाच राहत असल्याचे समोर आले. आरोपीचे आईवडिलांशी भांडण झाल्यामुळे अमेरिका सोडून भारतात आला होता. आरोपीचा जन्म कुर्ला परिसरातील असून त्याचे शिक्षणही अमेरिकेत झाले आहे. बायोलॉजीमधून पदवी प्राप्त झालेला जैब झुबेर अन्सारी २०१९ पासून भारतात आहे.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी सकाळी मीरा रोड पूर्वमधील नयानगर येथील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागे, अस्मिता एन्क्लेव्हजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सकाळी 8 च्या सुमारा एका इसमाने दोघांवर चाकू हल्ला केला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव जैब जुबेर अन्सारी असल्याचे कळाले. त्याने तुला कलमा वाचता येतो का? नमाज पढण करता येतं का असं विचारून आरोपीने सुरक्षारक्षकावर हल्ला केला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याच्याकडे ISIS, जिहाद अशी लिहीलेली नोटसुद्धा आढळली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच