AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ‘अचानक गाय खाली पडते आणि अवघ्या 2 मिनिटात मृत्यू’, भिवंडीत शेतकऱ्याच्या 15 गायींच्या मृत्यूनं खळबळ

शेती व्यवसाय आतबट्याचा खेळ झालेला असताना शेतकऱ्यांसाठी दुधव्यवसाय मोठा आधार देणारा ठरत आहेत. मात्र, त्यातही नवनवीन अडचणी येत असतात. ठाण्यातील भिवंडी तालुक्यात असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. भिवंडी तालुक्यातील देवरूग येथे हरीचंद्र केणे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील एकूण 21 गायींपैकी 15 गायींचा अचानक मृत्यू झाला.

VIDEO: 'अचानक गाय खाली पडते आणि अवघ्या 2 मिनिटात मृत्यू', भिवंडीत शेतकऱ्याच्या 15 गायींच्या मृत्यूनं खळबळ
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 05, 2021 | 10:18 AM
Share

सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, ठाणे : शेती व्यवसाय आतबट्याचा खेळ झालेला असताना शेतकऱ्यांसाठी दुधव्यवसाय मोठा आधार देणारा ठरत आहेत. मात्र, त्यातही नवनवीन अडचणी येत असतात. ठाण्यातील भिवंडी तालुक्यात असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. भिवंडी तालुक्यातील देवरूग येथे हरीचंद्र केणे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील एकूण 21 गायींपैकी 15 गायींचा अचानक मृत्यू झाला. शिल्लक राहिलेल्या 6 गायींची प्रकृती देखील नाजूक आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं आहे. या परिस्थितीत शासनाने मदत करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यानं केलीय.

15 गायींचा मृत्यू, मात्र, आजाराचं निदान नाही, अहवालाची प्रतीक्षा

शेतकऱ्याच्या गोठ्यातील एकूण 15 गायींचा एका आठवड्यात मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या गायींचा मृत्यू नेमका कोणत्या आजारानं झाला आहे याचं निदान अद्याप झालेलं नाही. पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांनी घटनास्थळी जाऊन एका गाईचं शवविच्छेदन (PM) करण्यात आलं. तसेच नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच गायींच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

शिल्लक राहिलेल्या 4 गाई आणि 2 वासरांनाही लागण, शेतकरी उद्ध्वस्त

पुण्यातून अहवाल येईपर्यंत पीडित शेतकऱ्याच्या गोठ्यात एकही गाय शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आहे. हरीचंद्र केणे यांच्या तबेल्यात वासरांसह एकूण 21 गायी होत्या. त्यापैकी 15 गायींचा मृत्यू झाला. शिल्लक राहिलेल्या 4 गाई आणि 2 वासरे यांनाही या आजाराची लागण झालीय. या जनावरांचीही परिस्थिती नाजूक आहे. या आजारानं गाय अचानक खाली पडते आणि अगदी दोन मिनिटात गाईचा मृत्यू होतोय.

शिवसेनेकडून पीडित शेतकऱ्याला मदतीची मागणी

शेतीसोबत आर्थिक मदत व्हावी म्हणून हरीचंद्र केणे यांनी दुधाचा जोडधंदा सुरू केला होता. मात्र, बघता बघता गोठ्यातील 15 गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घटना स्थळी शिवसेनेना ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे केलीय. त्यांच्या सोबत भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, अॅड विजय दिवाणे हेही उपस्थित होते.

हेही वाचा :

शेतकऱ्यांवर नवं संकट, पालघरमध्ये गाई-बैलांसह जनावरांना ‘या’ रोगाची लागण, शेती कामं रखडली

VIDEO: गाईनं घर पोसलं, धुळ्यात सर्पदंशाने मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याकडून माणसाप्रमाणे वाजतगाजत अंत्ययात्रा

औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा हकनाक मृत्यू

व्हिडीओ पाहा :

New disease in cow 15 animals of farmer dead in Bhiwandi

Follow Us
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर