Thane: सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांची पायपीट

ठाणे,  पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chatrapati Shivaji Maharaj Hospital Kalwa) प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांची पायपीट होत आहे. रुग्णालयात  नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने औषधाचा पुरवठा कमी (Shortage of Medicine) झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्ण व नातेवाईकांवर कळव्यातील व ठाण्यातील औषधांच्या दुकानात औषधे घेण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अल्प उत्पन्न असणारे नागरिक […]

Thane: सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांची पायपीट
| Updated on: Jul 22, 2022 | 7:42 AM

ठाणे,  पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chatrapati Shivaji Maharaj Hospital Kalwa) प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांची पायपीट होत आहे. रुग्णालयात  नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने औषधाचा पुरवठा कमी (Shortage of Medicine) झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्ण व नातेवाईकांवर कळव्यातील व ठाण्यातील औषधांच्या दुकानात औषधे घेण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अल्प उत्पन्न असणारे नागरिक सरकारी रुग्णालयात उपचार घेतात. त्यांच्यासाठी औषधांची सोया देखील रुग्णालयातच करण्यात येते, मात्र औषधांच्या तुटवड्यामुळे बाजारातून महागडे औषधं खरेदी करावे लागत आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेकडो रुण रोज भरती होतात. या रुण्णांच्या सुविधेसाठी महापालिका अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधाचा पुरवठा कमी केल्याने व रुग्णालयातील औषधांचे दुकान बंद असल्याने रुणांची गैरसोय होत आहे.

रुग्णालयात रुग्णांना देण्यासाठी लागणाऱ्या अनेक महत्वाच्या गोळ्या, औषधे व इंजेक्शन व इतर साहित्य सध्या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची सध्या फरफट होत असून, त्यांना रात्री बे रात्री संपूर्ण कळव्यात औषधासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सध्या रुग्णालयात रुग्णांना मोफत औषधे खूप कमी दिली जात असून, बहुतांशी औषधे बाहेरून आणावयास सांगितली जात असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. कॅल्शियम व व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांचाही तुटवडा सुरू असून, गोळ्या पुरवणाऱ्या ठेकेदाराचा ठेकाही संपला आहे.

कोट्यवधीचा निधी उपलब्ध असताना रुग्णांची होत असलेली हेळसांड अनेक प्रश्न निर्माण करत आहे. यावर निश्चित तोडगा कधी निघेल याचे प्रशासनाकडेही उत्तर नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी महिलांना औषधांसाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.