AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane : महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा, कुठे उभारणार स्मारक? वाचा सविस्तर

ठाणे पालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी फुले दाम्पत्याचं स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे.

Thane : महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा, कुठे उभारणार स्मारक? वाचा सविस्तर
mahatma phule and savitribai phule
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 8:22 PM
Share

ठाणे : ठाण्यात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाणे पालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी फुले दाम्पत्याचं स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच सर्व ओबीसी बांधवांनी ठामपा मुख्यालयात आनंदोत्सव साजरा केला. प्रस्ताव मांडणारे अशोक वैती आणि दिलीप बारटक्के यांचा ओबीसी बांधवांनी सत्कार केला.

ओबीसी एकीकरण समितीच्या मागणीला यश

ओबीसी एकीकरण समिती आणि ठाणेकर नागरिकांनी महात्मा फुले आणि सावित्री फुलेंचं स्मारक ठाण्यात उभारण्याची मागणी लावून धरली होती. त्याला सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली आहे त्यानंतर आज ठाणे महापालिकेच्या सभागृह नेते अशोक वैती यांच्या दालनात सर्व ओबीसी बांधवांनी सभागृह नेते अशोक वैती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पेढे भरवून आनंद उसव साजरा केला आहे.

यावेळी प्रफुल वाघोले, सचिन शिंदे, राहुल पिंगळे, राज राजापूरकर, सचिन केदारी, राजेंद्र देसाई, सुभाष देवरे, राजाभाऊ चव्हाण आदींनी नगरविकास मंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे महापौर नरेश म्हस्के,सभागृह नेते अशोक वैती, गटनेते दिलीप बारटक्के,विरोधी पक्षनेते शानु पठाण तसेच सर्व पक्षीय नगरसेवकांचे ओबीसी बांधवांनी आभार मानले आहे. त्यामुळे ठाण्यातल्या स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या स्मारकामुळे ठाणे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. आपल्याला सर्वात मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान मोठे आहे, त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेला वर्गही मोठा आहे.

जयंत पाटील शेकापच्या पाटलांना चहा देत होते, पण अजितदादांनी थांबवलं! वाचा नेमकं काय घडलं?

Nawab malik : परीक्षांमधील भ्रष्टाचाराशी मलिकांचा संबंध अधिवेशनात सिद्ध होईल- केशव उपाध्ये

सर्वात जास्त टॉर्क जनरेट करणारी बाईक बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.