AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजपला अजित पवार मदत करतात”; राष्ट्रवादीवर नेमकं कोण बरसलं…

आता नागालँड मधील राजकारणही पुढे आले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर आरोपर करण्यात काय अर्थ नाही तुमचा पॉलिटिकल अजेंडा मात्र जगासमोर आला आहे अशी टीका रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.

भाजपला अजित पवार मदत करतात; राष्ट्रवादीवर नेमकं कोण बरसलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 25, 2023 | 11:27 PM
Share

मुंबई : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या घडामोडींमुळे प्रचंड चर्चेत आले आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी शिवसेना, कधी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या राज्यातील राजकारण अर्थसंकल्पीय अधिवेशनापुढं घुटमळत असलं तरी नवे जुने आरोप प्रत्यारोप उखरून काढले जात आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे महाविकास आघडी आणि वंचितच्या आघाडीची जोरदार चर्चा सुरु होत असतानाच वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

त्यामुळे वंचितचे आणि राष्ट्रवादीचे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.  रोहित पवार यांनी वंचितवर टीका केल्याने पुणे निवडणुकीपासूनच ही शाब्दिक चकमक सुरू आहे.

वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना वाद्यावर टीका टिप्पणी केल्यामुळे राष्ट्रवादी आणि वंचितचा वाद वाढण्याची शक्यता आहे.

पुणे पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही भाजपला मदत करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यांच्या त्या टीकेनंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी ही त्यांची जुनी टीका आहे असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे.

रोहित पवार यांनी टीका केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे हे आता नागालँडमधील भाजपसोबतच्या युतीमुळे समोर आले आहे.

त्यामुळे भाजपला मदत हे रोहित पवार यांचे काकाच करतात. त्यांनी भाजपसोबत किती युत्या केल्या आहेत. पहाटेचे शपथविधी कसे केले आहेत.

आणि आता नागालँड मधील राजकारणही पुढे आले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर आरोपर करण्यात काय अर्थ नाही तुमचा पॉलिटिकल अजेंडा मात्र जगासमोर आला आहे अशी टीका रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.

Follow Us
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?