AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : कल्याणमध्ये दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण-डोंबिवली शहरात देखील शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी बाईक रॅली, मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो तरुण या रॅलीत सहभागी झाले होते.

Kalyan Crime : कल्याणमध्ये दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं Image Credit source: TV9
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Feb 20, 2022 | 4:33 PM
Share

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या मोहने परिसरात शिवजयंती (Shivjayanti)निमित्त काही तरुणांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी (Swords) नाचविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरू केला आहे. या व्हिडिओच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू करत या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयदीप पाटील आणि हर्षद भंडारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. (Video of two youths dancing with swords in Kalyan goes viral)

मोहने परिसरात शिवजयंती निमित्त रॅलीचे आयोजन

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण-डोंबिवली शहरात देखील शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी बाईक रॅली, मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात देखील सायंकाळच्या सुमारास शिवजयंती निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्व काही शांततेत सुरू असताना या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचवल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांना गिर्यारोहकांची अनोखी मानवंदना

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज, निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी गिर्यारोहण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना एक अनोख्या आणि साहसी प्रकारे मानवंदना दिलेली शनिवारी पाहायला मिळाली. जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्यासमोर असलेला वानरलिंगी सुळखा ज्याची उंची सुमारे 480 फूट उंच आहे असा हा सुळखा केवळ 3 तासांच्या आत सर करून महाराजांना अनोखी आदरांजली वाहिली. किल्याची उंची जमिनीपासून सुमारे 3000 फूट उंच आहे त्यामुळे वानरलिंगी सुळखा तीन तासाच्या आत पोहचल्यानंतर सर्वप्रथम मानवंदना म्हणून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरतर्फे महाराजांची आरती करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. (Video of two youths dancing with swords in Kalyan goes viral)

इतर बातम्या

कमी वयात सद्गुरु बारचा परवाना घेतल्याप्रकरणी अडचणी वाढ! समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

Wardha Crime : संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलीस कोठडी

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब