Thane Water supply : ठाणे महापालिकेतर्फे बुधवारी पाणीपुरवठा बंद, घरी पुरेसा साठा करण्याचे मनपाचे आवाहन

| Updated on: Aug 23, 2022 | 3:40 AM

बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत इंदिरानगर पंप हाऊसवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, विठ्ठल क्रीडा मंडळ, किसननगर इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहील.

Thane Water supply : ठाणे महापालिकेतर्फे बुधवारी पाणीपुरवठा बंद, घरी पुरेसा साठा करण्याचे मनपाचे आवाहन
गोळीबाराच्या घटनांनी ठाणे हादरले
Follow us on

ठाणे : ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला (Bhatsa River) वेळोवेळी पूर आला. पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये (Jackwell) मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा जमा झालेला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकला. त्यामुळं सदरच्या पंपाचा फ्लो (Pump Flow) कमी झाला आहे. तसेच इंदिरानगर संप येथे पाण्याची गळती झाली. सदरची गळती काढणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने बुधवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येत आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

या भागात राहणार पाणीपुरवठा बंद

बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत इंदिरानगर पंप हाऊसवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, विठ्ठल क्रीडा मंडळ, किसननगर इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी याची काळजी घ्यावी. घरी पुरेशा प्रमाणामत पाणीसाठी करून ठेवावा. जेणेकरुन बुधवारी घरी पाण्याची कमतरता पडणार नाही.

घरी पुरेसा पाणीसाठा करण्याचे आवाहन

वरील शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा. ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा यासाठी गाळ व कचरा काढणे आवश्यक आहे. त्यामुळं नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा