Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli Health : सरकार बदलला काळ बदलतोय, आरोग्य कर्मचाऱ्यांची कसरत कायम, गडचिरोलीतील ग्रामीण भागातील वास्तव

भामरागड तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गावामध्ये दुचाकीने प्रवास करून कर्तव्य बजावत असतात.

Gadchiroli Health : सरकार बदलला काळ बदलतोय, आरोग्य कर्मचाऱ्यांची कसरत कायम, गडचिरोलीतील ग्रामीण भागातील वास्तव
आरोग्य कर्मचाऱ्यांची कसरत कायमImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 4:12 PM

गडचिरोली : युग डिजिटल (Digital) युगात गेला तरी गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती आजही तीच. कच्चे रस्ते पायदळी प्रवास. सरकार बदलला काळ बदलला. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांची (Health Department) कसरत मात्र कायमच आहे. पावसाळ्यात नाल्यातून कंबरभर पाण्यातून वाट काढत आरोग्य कर्मचाऱ्यांनी गरोदर स्तनदा मातांना आरोग्य तपासणी व लसीकरण देण्यास आठ किलोमीटर पायदळी प्रवास करून दुर्गम भागात पोहोचावे लागते. आपल्या लसीकरणाचे बक्से डोक्यावर घेऊन या तीन महिलांनी पायदळी प्रवास केला. भामरागड (Bhamragarh) तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही पक्के रस्ते नाहीत. वीज पुरवठा पोहचलेला नाही. गावांमध्ये पायदळी प्रवास करून आरोग्य विभाग उपचार करीत असतात. तालुक्यातील गुंडेवर नाला दुधळी भरून वाहत असल्यामुळे बंगाळी गावात आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका व आशा वर्कर या तिघांनी 8 किलोमीटरची पायदळी प्रवास करून लसीकरणासाठी गावात पोहोचले. काल सकाळी आठ वाजता निघालेला हा लसीकरणाच्या पथक परत येईपर्यंत सायंकाळ झाली. या कर्मचाऱ्यांनी जेवण न करता दिवसभर आपले कर्तव्य बजावले. आजही या भागात पक्के रस्ते नाहीत.

पावसाळ्यात आरोग्य सेवा पुरविणे आव्हान

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर व छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात नाल्यातील कंबरभर पाण्यातून वाट काढत आरोग्य कर्मचाऱ्यांना गरोदर स्तनदा मातांना आरोग्य तपासणी असो लसीकरण पुरवावे लागते. भामरागड तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गावामध्ये दुचाकीने प्रवास करून कर्तव्य बजावत असतात. मात्र पावसाळ्यात इतर कर्मचाऱ्यांना त्रास नाही. कारण उंटावरून शेळ्या हकलले तरी त्यांना कोणी विचारणारही नाही. मात्र तसं आरोग्य कर्मचाऱ्यांना जमणार नाही. गरोदर मातेची तपासणी तसेच लसीकरण करण्यासाठी गेल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य सेवा पुरवणे आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची पायपीट

भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाला पावसाळ्यात दुथळी भरुन वाहत असतो. गुंडेनूर, बंगाळी, कोयर, बीनागुंडा, कुवकोडी, तुर्रेमरका, दामणमरका, फोदेवाडा, पेरमिलीभाटी, पुंगसूर इत्यादी गावांना जाण्यासाठी दुसऱ्या रस्ताच नाही. कधी डोंग्याने कधी कंबरभर पाण्यातून आरोग्य कर्मचारी वाट काढावी लागते. पक्के रस्त्यांचा अभाव पावसाळ्यात अनेक गावांना संपर्क तुटतो. असे असले तरी आरोग्य सेविका, आशावर्कर, अंगणवाडी कर्मचारी जीवाची पर्वा न करत दुर्गम गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवतात.

हे सुद्धा वाचा

गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.