नागपूर : एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-प्रशिक्षक वर्गात केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, एकल विद्यालयाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागात 1000 च्या वर शाळा सुरू आहेत. या शाळांसाठी मानकर ट्रस्ट (Mankar Trust) मोठं काम करत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत आहे. या कार्यक्रमाला आलेले जयकुमार गुप्ता हे एकेकाळी मी बांधकाम मंत्री (Minister of Construction) असताना घाटकोपरचा पूल बांधायचा होता. त्यावेळी त्यांनी टेंडर भरलं. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना डिसक्वालिफाय केलं. ते मला म्हणाले, एक संधी द्या. चांगलं काम करून दाखवतो. त्यांनी आज देशांमध्ये मोठमोठी काम केली आहेत. संघात आम्ही एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे जो शोषित आहे, गरीब आहे, त्यांची सेवा केली पाहिजे. त्याला ज्या दिवशी रोटी कपडा मकान मिळालं. तेव्हा आपलं काम सार्थकी लागलं असं समजायचं. या शाळेतील शिक्षक आणि पर्यवेक्षक एकच असतो. ते ज्या दुर्गम भागातून आले तिथे 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम घेणे सुद्धा कठीण असतं, असे दुर्गम भाग आहे. या ठिकाणी सुविधा नाही. डॉक्टर आहे तर दवाखाना नाही. दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, अशी परिस्थिती गडचिरोलीच्या दुर्गम भागात आहे.