नुसती मस्ती नाही तर माज, नगरसेवकाच्या नातवाकडून 64 वयाच्या वृद्ध रिक्षाचालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण, थेट..

माज आणि पैशांची मस्ती नक्की कशी असते, याचे एक ताजे उदाहरण पुढे आले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ वाहून प्रत्येकाच्या डोक्यात मुंग्या गेल्या. नगरसेवकाच्या नातवाने जे काही केले ते डोक्यात जाणारे आहे.

नुसती मस्ती नाही तर माज, नगरसेवकाच्या नातवाकडून 64 वयाच्या वृद्ध रिक्षाचालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण, थेट..
KDMC
| Updated on: Sep 02, 2026 | 2:56 PM

माज नक्की काय असतो हे केडीएमसी महापालिकेतील नगरसेवकाच्या नातवाने दाखवला. इतकी मस्ती की, थेट वृद्ध रिक्षाचालकाला मारहाण केली. नवी मुंबईतील महाविद्यालयात जात असताना पीयूष नाईक या तरुणाचा वयोवृद्ध रिक्षाचालक गफार शेख याच्याबरोबर बेलापूर रोडवरील कळवा पुलावर वाद झाला. त्यानंतर पीयूष याने शेख यांना मारहाण केली. यामध्ये शेख रक्तबंबाळ झाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओनंतर लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला. कळवा उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. 20 वर्षाच्या पीयूष नाईकचे आजोबा केडीएमजी महापालिकेत नगरसेवक आहेत. आपले कोणीच काही करू शकत नाही, असे पीयूषच्या वागण्यावरून दिसले.

चक्क 20 वर्षाच्या पीयूषने 64 वर्षाच्या वृद्ध रिक्षाचालकाला मारहाण केली. ही मारहाण इतकी जास्त भयंकर होती की, या मारहाणीनंतर गफार शेख रक्तबंबाळ झाले. पीयूष केतन नाईक याच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. केडीएमसीचे नगरसेवक गणेश कोटे यांचा तो नातू आहे. मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या गफार याचा व्हिडीओ मंगळवारी सकाळी व्हायरल झाला.

मारहाण करणाऱ्या पीयुषविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिक करत आहेत. संतप्त प्रक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. इतका माज बरा नसल्याचेही नागरिकांकडून म्हटले जातंय. पीयूष नवी मुंबईतील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तो केडीएमसीच्या लोगोचे स्टीकर असलेल्या कारने कळव्यातील उड्डाणपुलावरून कॉलेजला जात होता, त्यावेळी मारहाणीची घटना घडली.

याप्रकरणी शिंदे सेनेचे कार्यकर्ते असलेले त्याचे वडील केतन नाईक यांचीही चौकशी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात एनसी दाखल असली तरी कारवाईची मागणी पीयूषविरुद्ध स्थानिकांनी केली आहे. मात्र, गफार यांना इतकी जास्त मारहाण होऊनही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावरही व्हायरल व्हिडीओनंतर लोक कमेंट करून संताप व्यक्त करत आहेत. अशांना जेलमध्ये पाठवले पाहिजे, असेही अनेकजण म्हणताना दिसत आहेत. आपल्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीला मारताना याला कसे काही वाटले नाही, असे विचारले जातंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us