AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजब पुण्यातील गजब प्रकार! दोन मुलांनी आई-वडिलांना मार मार मारलं; भर रस्त्यात…व्हिडीओ पाहून धक्काच बसेल!

मुलांनी आपल्या बापाला जमिनीच्या वादातून मारलं आहे. आईच्या नावावर असलेली जमीन विकल्याने मुलांनी वडिलांना रागाच्या भरात मारल्याचं सांगितलं जातंय. इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील ही घटना आहे.

अजब पुण्यातील गजब प्रकार! दोन मुलांनी आई-वडिलांना मार मार मारलं; भर रस्त्यात...व्हिडीओ पाहून धक्काच बसेल!
pune indapurImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 10:10 PM
Share

Pune News : पुणे जिल्ह्यात नेहमीच काहीतरी घडत असतं. या जिल्ह्यात गेल्या काही काळात अनेक मोठे क्राईम घडले आहेत. खुनाच्या घटनांत तर चांगलीच वाढ झालेली आहे. याच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्या आई-विडिलांनी लहानपणी संस्कार केले, जीवापाड जपलं, आयुष्यभर कष्ट करून मोठं केलं, त्याच आई-वडिलांना दोन भावांनी दांडक्याने मारहाण केली आहे. या घटनेचा हादरवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ही दुर्दैवी घटना पाहून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आई- वडील रोडवर पडल्याचे दिसत आहेत. त्यांच्या मागे एक पांढऱ्या रंगाची कार उभी आहे. समोर या दाम्पत्यांची दोन मुलं उभी आहेत. या दोघांपैकी एकाच्या हातात काठी दिसत आहे. याच काठीने तो आपल्या वडिलांना मारताना दिसतोय. तर दुसरीकडे बाजूला बसलेली आई आपल्या मुलांना ‘माझ्या नवऱ्याला मारू नका रे’ अशी विनवणी करताना दिसत आहेत.

वडिलांना मारण्यामागचं नेमकं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार मुलांनी आपल्या बापाला जमिनीच्या वादातून मारलं आहे. आईच्या नावावर असलेली जमीन विकल्याने मुलांनी वडिलांना रागाच्या भरात मारल्याचं सांगितलं जातंय. इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील ही घटना आहे. ही घटना घडल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आपल्या आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या दोन मुलांची नावे संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत अशी आहेत.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,