दूधासह आता पेट्रोलमध्ये ही पाण्याची भेसळ; उरणच्या पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये भरले जातेय पाणी मिश्रीत पेट्रोल 

वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही वाहने बंद पडत आहेत. वाहन सुरु होत नाही आणि सुरु झाली तरी काही वेळाने पुन्हा बंद पडतात. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या प्रकरणाची शहानिशा केली असता उरण तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी टाकून पेट्रोल विकण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

दूधासह आता पेट्रोलमध्ये ही पाण्याची भेसळ; उरणच्या पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये भरले जातेय पाणी मिश्रीत पेट्रोल 
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 4:40 PM

उरण : आता पर्यंत आपण दुधात(Milk) पाण्याची भेसळ केल्याचे पाहिले आहे. आता मात्र दुधाप्रमाणेच पेट्रोलमध्ये देखील पाण्याची भेसळ(adulteration of water in petrol ) होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उरणच्या(Uran) एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क पाणी भरण्यात आले आहे. वाहन चालक पेट्रोल पंपावरुन( petrol pump) बाहेर पडतात अचानक वाहन बंद पडल्याने हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. यामुळे वाहन चालकक चांगलेच संतापले आहे. संबधीत पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.

रस्त्यात अचानक वाहने बंद पडतात

उरणमधील वाहनचालकांच्या वाहनांमध्ये सध्या पेट्रोल टाकल्यानंतर पाणी निघत आहे. झटके देत वाहने रस्त्यांवर मध्येच बंद पडत आहेत. त्यामुळे पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाहनांच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आढळून येत आहे. पेट्रोल टाक्यांमध्ये पाणी असल्यामुळे अनेकांची वाहने अचानक बंद पडून खराब झाल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.

पंपावर भरले जातेय पाणी मिश्रित पेट्रोल

वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही वाहने बंद पडत आहेत. वाहन सुरु होत नाही आणि सुरु झाली तरी काही वेळाने पुन्हा बंद पडतात. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या प्रकरणाची शहानिशा केली असता उरण तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी टाकून पेट्रोल विकण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

उरण खोपटे ब्रिजजवळ असलेल्या आनंदी पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणुक

उरण खोपटे ब्रिजजवळ असलेल्या आनंदी पेट्रोल पंपावर हा प्रकार होत आहे. आनंदी पेट्रोल पंपावर डोलघर येथील नागरीकांनी पेट्रोल भरले मात्र बाईक पुढे जाताच अचानक बाईक बंद पडली. पेट्रोल चेक केले असता पेट्रोलमध्ये पाणी आढळून आले. याचा जाब पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना विचारला असता त्यांना उलट सुलट उत्तरे देण्यात आली. उरणकरांनी शंभर रुपयाचे पेट्रोल पुन्हा एका स्वच्छ बाटलीत विकत घेतले. त्यातही पाणी आढळले. त्यामुळे या भेसळ करणाऱ्या पंपांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.