Tiger Shroff Case update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; राधा-बबिताच्या एन्ट्रीने सगळे चकीत, दादर कनेक्शनही उघड
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवनवीन माहिती उघड होत आहे. आता या प्रकरणात राधा-बबिताच्या एन्ट्रीने सगळे चकीत झाले आहेत. आरोपींचं दादर कनेक्शन देखील उघड झालं आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाने अख्ख बॉलिवूडमध्ये दहशत पसरली आहे. या गोळीबारातून टायगर थोडक्यात बचावला. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. टायगर गोळीबार प्रकरणात आता दोन मुलांचाही सहभाग असल्याचे उघड झालं आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या बिश्नोईच्या टोळी तरुणींचा देखील सहभाग असल्याचे उघड झालं आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हल्ल्याशी संबंधित चार जणांना अटक केली आहे. त्यात दोन महिलांचा देखील समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी कुणाल, सुमित, राधा आणि बबिता यांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शस्त्रांचा व्यवस्था करण्यात या चौघांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. याच शस्त्र, पिस्तुलीच्या मदतीने टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता.
कोण आहे राधा अन् बबिता?
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये शस्त्राची तस्करी करणाऱ्यांमध्ये राधा आणि बबिता यांचाही हात आहे. दोन्ही मुली गँगसाठी कुरिअरचं काम करायची. राधा आणि बबिता ही उत्तर प्रदेशची राहणारी आहे. त्यांनी मुंबईच्या दादरमध्ये येऊन हल्लेखोरांना शस्त्र पुरवली होती. कुणाल आणि सुमितने शस्त्राची सोय केली होती. तर राधा आणि बबिताने मुंबईच्या दादारमध्ये जाऊन तिन्ही हल्लेखोरांना शस्त्र पुरविली होती. मुंबई पोलिसांनी त्यांना ट्रांजिट रिमांडवर घेतलं. विशेष पथकाच्या एनडीआर टीमने चौघांना कोर्टासमोर देखील हजर केलं होतं. कोर्टात हजर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौघांचा ताबा मागितला होता. मुंबई पोलिसांनी चौघांच्या चौकशीची परवानगी कोर्टात मागितली. त्यानंतर कोर्टाने आरोपींच्या ट्रांजिट रिमांडची मागणी मान्य केली.
टायगर श्रॉफवर रविवारी झाला हल्ला
अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ हा रविवारी जुहू परिसरात फुटबॉल खेळायला गेला होता. त्यानंतर बाहेर चाहत्यांशी चर्चा करत कारमध्ये बसला. त्यानंतर हल्लेखोरांनी टायगरवर गोळीबार केला. दोघांनी कारच्या समोरून गोळीबार केला. त्यांनी जवळपास 6-7 राऊंड गोळीबार केला. हल्लेखोराची बंदूक जाम झाल्याने टायगर बचावला. या घटनेत टायगरचा ड्रायव्हर आणि इतर एक व्यक्ती जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण भीतीचं वातावरण पसरलं आहे.