AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff Firing : टायगरवर हल्ला होताच मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; काय दिले आदेश?

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांना फोन करून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यात टायगरचा ड्रायव्हर जखमी झाला असून, पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. आरोपींना पळून न देण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Tiger Shroff Firing : टायगरवर हल्ला होताच मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; काय दिले आदेश?
tiger shroffImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 10:33 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला होताच बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. टायगरच्या गाडीवर तीन हल्लेखोरांनी धाडधाड गोळीबार केला. सुदैवाने टायगर या हल्ल्यातून बचावला आहे. मात्र, त्याचा ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी झाला आहे. तसेच अजून एक जण या हल्ल्यात जखमी झाला असून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची माहिती मिळताच मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फोन केला. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच वेगाने तपास करण्याचे आदेश दिले. आरोपी पळून जाता कामा नये. तसेच या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनीही तात्काळ 15 पथके स्थापन केले आहेत. त्यापैकी आठ पथके वांद्रे, कुर्ला, दादर आणि कल्याण या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर जाऊन आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच जुहू परिसर आणि इतर भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतल्या जात असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

शिंदेही संतापले

दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही संतापले आहेत. राज्य सरकार अशा कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही. कोणतीही दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

काय घडलं?

आज संध्याकाळी सुमारे 7च्या सुमारास सांताक्रूझ-जुहू परिसरात टायगर श्रॉफ आणि त्याचे सहकारी फुटबॉल खेळायला गेले होते. जेव्हा ते मैदानाबाहेर पडत होते, तेव्हाच त्याच्या गाडीवर गोळीबार झाला. यामध्ये त्याच्या ड्रायव्हरच्या डाव्या हाताला गोळी लागली असून जवळच उभा असलेला एक ऑटो रिक्षा चालक देखील जखमी झाला आहे. ड्रायव्हरला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून टायगर श्रॉफ सुरक्षित आहे. टायगरला गोळी लागलेली नाही.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध आणि प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष टीम्स तयार करण्यात आल्या असून त्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत. हल्लेखोर बाईकवरून आले होते असे सांगण्यात येत असून ते कोण होते? कुठून आले होते? आणि गोळीबारामागील कारण काय आहे? या सर्व प्रश्नांचा तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,