मोठी बातमी! टायगरनंतर आता ‘हा’ बडा अभिनेता टार्गेटवर, सीक्रेट प्लॅन समोर येताच हालचाली वाढल्या, मुंबई पोलिसांचा तडकाफडकी निर्णय

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामध्ये आता मोठे खुलासे होत आहेत. याप्रकरणी काल मोठी माहिती समोर आली होती, की आरोपींना टायगरवर हल्ला करायचाच नव्हता तर त्यांना एका मोठ्या व्यक्तीवर हल्ला करायचा होता. त्यानंतर आता पोलिसांकडून मुंबईत कलाकारांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतली जात आहे.

मोठी बातमी! टायगरनंतर आता हा बडा अभिनेता टार्गेटवर, सीक्रेट प्लॅन समोर येताच हालचाली वाढल्या, मुंबई पोलिसांचा तडकाफडकी निर्णय
Tiger Shroff Firing Case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 3:55 PM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणावर मोठी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तीन आरोपी अटकेत असून त्यांच्या प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना टायगर श्रॉफवर गोळीबार करायचाच नव्हता, त्यामुळे त्यांनी आधी बॉलिवूडचे मोठे स्टार अक्षय कुमार, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या घरांची रेकी केली होती. पण त्यांना या सर्व स्टार्सच्या सुरक्षेला भेदून जाणं कठीण झालं होतं. त्यामुळे आरोपींनी ऐनवेळी प्लॅनमध्ये बदल केला आणि टायगरवर हल्ला करण्यात आला.

अक्षय कुमारच्या घरची सुरक्षा वाढण्यात आली

अक्षय कुमार याचेही घर जुहू परिसरात असल्याने आणि अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबारही जुहूमध्येच झाल्याच्या पार्श्वभूमिवर आता बॉलिवडूचा खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमार याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईतील जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावर असलेल्या या प्राइम बीच बिल्डिंगच्या ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरवर अक्षय कुमार याचे घर आहे. टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून ही खबरदारी म्हणून सुरक्षा वाढण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...

चौकशीदरम्यान आरोपींकडून नमके कोणते खुलासे?

चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की टायगर श्रॉफ यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी अक्षय कुमार, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या घरांची देखील रेकी केली होती. या महत्त्वपूर्ण माहितीनंतर मुंबई पोलिसांनी अक्षय कुमार याच्यासह अनेक कलाकारांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली आहे. सध्या अक्षय कुमार याच्या घरी जुहू पोलीस पोहोचले असून, या बिल्डिंगच्या आत सुरक्षेसाठी महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी बडोद्यातून आणखी एका तरुणाला अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव अंकित असे आहे. मुंबई पोलिसांनी ट्रान्झिट मागणीनुसार आरोपीला गोहाना न्यायालयात हजर केले. अंकित हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा उजवा हात असलेल्या अनिल पंडितच्या संपर्कात होता. या कटात सामील असल्याचा अंकितवर आरोप आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us