AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन सख्खी भावंडे… जीवाला जीव देणारे… तिघांचाही एकाच ठिकाणी बुडून मृत्यू; राज्यात एकूण 6 जण बुडाल्याने हळहळ

Tragic News : पाण्यात बुडून 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीत 3, नाशिकमध्ये 2 तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

तीन सख्खी भावंडे... जीवाला जीव देणारे... तिघांचाही एकाच ठिकाणी बुडून मृत्यू; राज्यात एकूण 6 जण बुडाल्याने हळहळ
6 Child DiedImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 19, 2026 | 3:33 PM
Share

उन्हाळ्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर गेला असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी राज्याच्या विविध भागात अनेकजण पोहण्याचा आनंद लुटतात. अशातच आता पाण्यात बुडून 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीत 3, नाशिकमध्ये 2 तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमरावतीत 3 सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसली धरणात बुडून तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. मनोहर निमकर यांच्या शेतातील झोपडीत राहणाऱ्या संतुलाल उईके यांच्या पंकज संतुलाल उईके (वय 10) प्रिया संतुलाल उईके (वय 8) पवन संतुलाल उईके (वय 7) यांचा मृत्यू झाला आहे. ही तीनही मुले नरखेड येथील आश्रम शाळेत शिकतात. ही मुले धरणात आंघोळीला किंवा मच्छी मारण्यासाठी गेल्याचा अंदाज आहे, मात्र या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव जवळील चिखली येथे हौदात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दर्शन जगदीश भोये (वय 4) तन्मय निलेश भोये (वय 3) दोघेही भाऊ हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत असतांना जवळच घर बांधकामासाठी खोदलेल्या पाणी साठवण खड्यात पडल्याने दोन्ही बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दोन्ही मुले खड्यात पडल्याचे घरच्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. पाण्यातून काढून त्यांना तात्काळ उपचारासाठी बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता प्राथमिक अहवालानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवच्छेदनासाठी दोन्ही मुलांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‍शवच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळी पसरली आहे.

अहिल्यानगरमध्ये 14 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू

प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरात घडली आहे. कुटुंबियांसमोरच चिमुकल्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आई वडिलांसोबत नदीवर गेलेला 14 वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रात बुडाला. दिनेश नितीन जाधव असं या मुलाचे नाव आहे. हा मुलगा बुडाल्यानंतर गायब झाला. राहाता, शिर्डी आणि श्रीरामपुर नगरपालिकेच्या आपत्कालिन विभागाला 19 तासानंतर या मुलाचा मृतदेह मिळाला आहे.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?