AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हजेरीसाठी काटेकोर असलेल्या तुकाराम मुंढेंचे आदेश, म्हणाले…..

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात (Tukaram Mundhe order 50 percent attendance). महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि दररोज कामावर हजर राहावे, यासाठी ते आग्रही असतात.

हजेरीसाठी काटेकोर असलेल्या तुकाराम मुंढेंचे आदेश, म्हणाले.....
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 19, 2020 | 7:41 PM
Share

नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात (Tukaram Mundhe order 50 percent attendance). महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि दररोज कामावर हजर राहावे, यासाठी ते आग्रही असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या 50 टक्केच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामावर रुजू राहावे, असे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत (Tukaram Mundhe order 50 percent attendance).

जगभरात थैमान घालणारा कोरोना राज्यातही फोफावत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी कार्यालयांवर 50 टक्के उपस्थितीचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयातील 50 टक्के कर्मचारी आठवडाभर किंवा काही दिवस कामे करतील तर इतर सुट्टीवर जातील. त्यानंतर सुट्टीवर गेलेले 50 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि इतर सुट्टीवर जातील, अशा आळीपाळीने काम करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या या आदेशानंतर तुकाराम मुंढे यांनी परिपत्रक जारी करत महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीचे निर्देश दिले. तुकाराम मुंढें यांनी परिपत्रकात आणखी काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जे कर्मचारी सुट्टी घेऊ इच्छिता त्यांना तातडीने सुट्टी देण्याचे आदेश मुंढेंनी दिले.

महापालिका कर्मचाऱ्यांनी आपला पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक कार्यालयाला द्यावा. सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी घरीच राहावे. कार्यालयातून कधीही उपस्थित राहण्याच्या सुचना प्राप्त झाल्यास कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे अनिवार्य राहील, असंही मुंढे यांनी म्हटलं आहे. मात्र, हे निर्देश आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग आणि त्यांच्या प्राशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांना लागू राहणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या :

लेटलतीफ कर्मचारीही सरळ, तुकाराम मुंढेंच्या शिस्तीने नागपूर मनपात 100 टक्के हजेरी

तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज एक महिना!.

तुकाराम मुंढेंचा दणका, उघड्यावर लघुशंका करणाऱ्याला स्वतः पालिका कार्यालयात नेलं

तुकाराम मुंढेंची डॅशिंग कारवाई, गँगस्टर आंबेकरचा अनधिकृत बंगला पाडला

मध्येच वाजलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त, नो जीन्स, क्लीन शेव्ह, तुकाराम मुंढेंची कडक शिस्त! 

तुकाराम मुंढेंचा धडाका, 3 दिवसांत 22 बाजारातील तब्बल 2500 फेरीवाल्यांवर कारवाई

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...