महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अभिजीत दिपकेच्या लग्नाबद्दल मोठा प्रश्न, आईला म्हटले लग्न..

कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या काही दिवसात देशभरात धुमाकूळ घातला. अभिजीत दिपके यांच्या उपोषणाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा दावा लागला. नीट पेपरफुटी प्रकरण देशभर गाजले.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अभिजीत दिपकेच्या लग्नाबद्दल मोठा प्रश्न, आईला म्हटले लग्न..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 01, 2026 | 8:39 AM

कॉकरोच जनता पार्टीचा अध्यक्ष अभिजीत दिपके सध्या तूफान चर्चेत आहे. अभिजीत दिपके काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून भारतात दाखल झाला आणि प्रसिद्धीत आला. जंतर मंतरवरील पहिल्या आंदोलनात अभिजीत दिपके याला अपयश मिळाले. मात्र, 20 जूनचे आंदोलन यशस्वी झाले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात अभिजीत दिपकेने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला देशभरातून विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थी जंतर मंतरवर जमले. विद्यार्थी आक्रमक होताना दिसले. हे आंदोलन फक्त दिल्ली पुरतेच मर्यादित राहिले नाही तर विद्यार्थी देशभरात रस्त्यावर उतरताना दिसले. शेवटपर्यंत अभिजीत दिपके केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहिले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर हे आंदोलन थांबले. मुंबईसह अन्य शहरांमध्ये विद्यार्थी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात रस्त्यावर उतरले होते.

अभिजीत दिपके सध्या त्यांच्या घरी आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले.  त्यानंतर अनेक नेते अभिजीत दिपके यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके याच्या आईला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला.

यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिजीत दिपके याच्या घरी जात उद्धव ठाकरे यांना व्हिडीओ कॉल करून दिला. अभिजीत दिपके आणि उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद झाला. खैरे यांनी म्हटले की, मी अभिजीत दिपकेंच्या घरी एक तास होतो.

अभिजीत दिपके याच्या आईसोबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके लग्न कधी करणार असल्याचे विचारले. यावर अभिजीत दिपके यांची आई अनिता यांनी म्हटले की, सर्व आई वडिलांना वाटते की, त्यांच्या मुलांनी लग्न करावीत. हा पण हा त्याचा पूर्ण निर्णय असेल. अभिजीत दिपके याच्या लग्नाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अभिजीतच्या लग्नाबद्दल आईने भाष्य केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us